⁠
Uncategorized

45 Days Strategy – MPSC 2020

45 Days Strategy for MPSC 2020 Prelims.

नमस्कार मित्रानो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 MPSC 2020 अवघ्या 45 दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यानुसार आपण अभ्यास करतचं असाल.
पण तरी शेवटी 45 दिवसात नेमक प्लानिंग कस करायचं याचा एक संभ्रम मनात असतो. तो दूर करण्यासाठी हा लेख आहे.

सर्वप्रथम या दिवसात आत्मविश्‍वास टिकविणे आणि अभ्यासाचा वेग वाढविणे यावर लक्ष द्यायला हवे.
महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी म्हणून अभ्यास करा. त्यासाठी खाली काय करायला हवे आणि काय करायला नको..
त्याचे सविस्तर विश्‍लेषण दिलेले आहे.


Things to Do (करावयाच्या गोष्टी)

1) सर्वप्रथम आपण किती Syllabus Cover केला आहे आणि किती बाकी आहे याचा अंदाज घ्या, म्हणजे तुम्हाला योग्य नियोजन करता येईल.
या बरोबर विषयानुसार प्रश्न पत्रिका सोडवा म्हणजे तुम्हला तुमच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येण्यास मदत होईल.

2) दररोज मागील वर्षीचे प्रश्‍न वाचा आणि सोडवून बघा (साधारण 2015 ते 2019 पर्यंत)

3) नियोजन – महत्वाचे विषय : MPSC 2020

i) भूगोल
ii) इतिहास
iii) राज्यशास्त्र
iv) अर्थशास्त्र 
v) पर्यावरण 
vi) विज्ञान


6 विषय आणि 45 दिवस = योग्य नियोजन केल्यास 2 revision शक्य आहेत.

दिवस x विषय

1st revision    =   5  x  6  (प्रतिविषय 4 दिवस) = 30 दिवस
2nd revision  =   2  x  6  (प्रतिविषय 2 दिवस) = 12 दिवस

 एकूण    42 दिवस

(Note : शेवटचे 3 दिवस फक्त महत्वाचे Topic व प्रश्‍नसंच विश्‍लेषणासाठी)


4) याबरोबर = दररोज कमीत कमी 2 तास = C-SAT
दररोज कमीत कमी 1 तास = चालू घडामोडी

दररोज कमीत कमी 2 तास = प्रश्‍न सोडविणे आणि Analysis
C-SAT करणे महत्वाचे आहे. त्यास कुठलिही दिरंगाई करु नको. त्यासाठी Passages उतारे आणि गणिते सोडविणे हाच उपाय आहे.

5) तुमच्या अभ्यासाचा दर आठवड्याला आढावा घ्या आणि राहिलेल्या गोष्टी पूर्ण करा

6) याच बरोबर या 45 दिवसात आहार आणि झोप व्यवस्थित घ्या. म्हणजे पेपरच्या दिवशी कुठलाही त्रास होणार नाही.

7) शक्य झाल्यास व्यायाम अथवा ध्यान करा

8) सर्वात महत्वाचे शेवटच्या 2 दिवसात काय वाचायचे आहे याचे आताच नियोजन करुन ठेवा.


Things Not to do (या गोष्टी टाळा)

1) अत्यावश्यक असेल ते सोडून कुठलेही नवीन पुस्तक नोट्स वाचू नका

2) शक्यतो तर मोबाईलचा इतर वापर टाळा (उदा. Whatsapp, Youtub etc)

3) तुमच्या प्राथमिकता (Priorities) ठरवा व अनावश्यक गोष्टी टाळा

4) खूप जास्त पेपर सोडवणेही घातक ठरु शकते. शेवटी Revision आणि Analysis होणे गरजेचे आहे.

वरील गोष्टींचे /सूचनांचे पालन केल्यास यश नक्कीच तुमचे असेल. स्वत :वर विश्‍वास ठेवा आणि झोकून अभ्यासाला लागा.


45 Days Strategy - MPSC 2020

या 45 दिवसांचे भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होवून कामाला लागा. येणार्‍या पूर्व परीक्षेसाठी आपणा सर्वांना ‘’Team Mission MPSC’’ कडून शुभेच्छा…!

Related Articles

2 Comments

Back to top button