राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या लिपिक टंकलेखक भरती परीक्षेत कौशल्य चाचणीत तांत्रिक अडथळा आल्याने ती नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली होती. आयोगाने अर्जदारांचे म्हणणे नाकारल्यानंतर साडेतीनशेपेक्षा जास्त उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) अर्ज दाखल केले होते.
चाचणीप्रसंगी बटण चालत नव्हते, कीबोर्ड व्यवस्थित नव्हते आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या. ‘मॅट’चे न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव व प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी सर्व अर्ज फेटाळल्याने प्रलंबित ७ हजार उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
४ जून रोजी झालेल्या चाचणीत अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यासंबंधीच्या तक्रारी करण्यात आल्या. ५ जुलै रोजी अडचणी दूर करण्यात आल्या. नवीन कीबोर्ड व इतर बाबी बसवल्याचा मॅटमध्ये अर्जदारांनी दावा केला. संबंधित दावा मॅटने ग्राह्य धरला नाही. सर्व अर्ज फेटाळले.