पदवीधरांना संधी ! न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये ३०० जागा ; पगार ६२ हजारापर्यंत

Published On: सप्टेंबर 4, 2021
Follow Us

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ३०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ३००

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून किमान ६०% गुणांसह कॊणत्याही शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष

वयो मर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३२,७९५/- रुपये ते ६२,३१५/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२१

निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये यशस्वी घोषित उमेदवारांना नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रस्तावित मुख्य परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.newindia.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now