⁠
Jobs

विधानसभा सचिवालयात 5वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. पगार 20,200 मिळेल

केवळ पाचवीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांनाही सरकारी नोकरी मिळू शकते, तीही विधानसभेच्या सचिवालयात. राजस्थानमध्ये ही भरती होत आहे. राजस्थान विधानसभा सचिवालयाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या भरतीची वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत आहे. म्हणजे 40 वर्षांचे उमेदवारही यासाठी फॉर्म भरू शकतात.

राजस्थान विधानसभेच्या सचिवालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसाठी 11 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 2, ओबीसीसाठी 3, एमबीसीसाठी 2 आणि ईडब्ल्यूएससाठी 4 पदे आहेत. या पदांसाठी २९ जूनपर्यंत अर्ज करता येतील. अर्ज करण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट Assembly.rajasthan.gov.in ला भेट देऊ शकता.

पात्रता काय असावी
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार ५वी उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवाराचे वय 18-40 वर्षांच्या दरम्यान असावे. कमाल वयोमर्यादेत SC, ST, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, सामान्य आणि EWS प्रवर्गातील महिलांना 5 वर्षे आणि SC, ST आणि OBC प्रवर्गातील महिलांना 10 वर्षांपर्यंत सूट दिली जाईल.

निवड कशी होईल
भरतीसाठी अधिक संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास, एक प्राथमिक परीक्षा घेतली जाईल किंवा अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

इतका पगार मिळेल
पदांवर नोकरी मिळाल्यानंतर, उमेदवारांना स्तर 1 अंतर्गत 5200-20,200 रुपये वेतन बँड दिले जाईल. याशिवाय, इतर माहितीसाठी अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Articles

Back to top button