---Advertisement---

पाच वेळा अपयश ; मात्र शेवटच्या प्रयत्नात मिळवले यश, वाचा नमिता शर्मांची यशोगाथा..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story आपल्या सर्वांना माहित आहे की, यश अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. परंतू पुढे प्रवास चालू ठेवण्यासाठी धैर्य आवश्यक असते. असे काही विद्यार्थी आहेत जे अपयशाचा सामना करूनही आपली स्वप्ने सोडत नाही. अशाच एका महिला आय.आर.एस अधिकार ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी तब्बल सात वर्षांचा संघर्ष केला. त्यानंतर त्यांना हे यश मिळवले.

नमिता शर्मा (Namita Sharma) यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे आय.बी.एम मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. या सगळ्यात त्या त्यांच्या कामावर खूश नव्हत्या. त्यामुळे, त्यांनी युपीएससीची तयारी करण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

---Advertisement---

एवढ्या मोठ्या निर्णयानंतर नमिता या सलग चार वेळा पूर्व परीक्षेत नापास झाल्या हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. पण त्यांनी परीक्षेसाठी खूप तयारी केली पण योग्य दिशेने नाही. त्यांनी ग्रॅज्युएशन पास झाल्यापासून सर्व सरकारी परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्यातच युपीएससी मधील सुरुवातीचे तीन प्रयत्न हे परीक्षेची माहिती नसतानाही दिल्याने अपयश आले‌.असे असूनही नमिता यांनी आशा सोडली नाही आणि मेहनत करत राहिल्या. या काळात संयमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिल्या.

नमिता यांनी अखेर ५व्या प्रयत्नात पूर्व चाचणी पास केली आणि मुलाखतीला पोहोचली. मात्र, थोड्या फरकाने अंतिम यादीत स्थान मिळवता आले नाही. निकालाने निराशा न होता त्यांनी सकारात्मक पद्धतीने स्वीकार केला. यावेळी त्यांचा आत्मविश्वास वाढला. अखेर, CSE २०१८ मध्ये, त्यांनी ऑल इंडिया रँक १४५ मिळवला आणि त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. मित्रांनो, स्वतःला सुधारण्यासाठी फक्त प्रत्येक दिवसावर लक्ष केंद्रित करा.यासाठी आपणच आपले स्पर्धेक बनले पाहिजे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts