---Advertisement---

मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! लाखोंच्या घरात पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

मुंबई मेट्रोल रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शवेटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत.
एकूण जागा : ११

या पदांसाठी होणार भरती?
मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजरसाठी २ जागा रिक्त आहेत.तर असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी ५ जागा रिक्त आहेत.असिस्टंट मॅनेजरसाठ २ जागा आहेत. डेप्युटी इंजिनियर पदासाठी १ रिक्त जागा आहे. ज्युनिअर इंजिनियरसाठी १ रिक्त जागा आहे.

---Advertisement---

या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. याबाबत सर्व माहिती उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

वयोमर्यादा :
डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियरसाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

इतका पगार मिळेल?
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ८० हजार ते २,२०,००० रुपये पगार देण्यात आला आहे.असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ७० हजार ते २,००,००० रुपये पगार देण्यात येणार आहे.असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी ५० हजार ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ३५,२८० ते ६७,९२० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल.याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट : https://mmrcl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now