---Advertisement---

सायबर स्पेसवर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद

By Saurabh Puranik

Published On:

cyberspace-conference-delhi
---Advertisement---

सायबर स्पेसवर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. या वेळी ते म्हणाले- मागच्या दोन दशकांपासून सायबर स्पेसच्या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. अगोदर फोन आला, मग मोबाइल आणि आता सोशल मीडियाने माहिती-तंत्रज्ञानाला मोठी चालना दिली आहे. भारतात जनधन- आधार- मोबाइल (JEM)ने सर्वसामान्यांसाठी नवे मार्ग उपलब्ध केले आहेत. आज भारताचा शेतकरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऑपरेट करतो.” या परिषदेत 120 देश सामील झाले आहेत. सायबर फॉर डिजिटल इन्क्लूजन, सायबर फॉर इन्क्लूसिव्ह ग्रोथ, सायबर फॉर सिक्युरिटी आणि सायबर फॉर डिप्लोमसीवर चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून फ्रान्स, जपान, इस्रायल आणि ब्रिटनसहित 120द देशांचे तब्बल 10 हजार रिप्रेझेंटेटिव्ह यात सामील होतील. याआधी हे संमेलन लंडन आणि बुडापेस्टमध्ये झालेले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now