AIASL Recruitment : मुंबईत 10वी पास उमेदवारांसाठी 998 जागांवर भरती

AIASL Recruitment 2023 एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 998
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हँडीमन 971
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

2) यूटिलिटी एजंट (पुरुष) 20
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
3) यूटिलिटी एजंट (महिला) 07
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी -500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल:
हँडीमन – 21,330/-
यूटिलिटी एजंट – 21,330/-

निवड पद्धत :
हँडीमन/ युटिलिटी एजंट:
(a) शारीरिक सहनशक्ती चाचणी (जसे की वजन उचलणे, धावणे). केवळ शारीरिक सहनशक्ती चाचणीत पात्र ठरलेल्यांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल.
(b) वैयक्तिक/आभासी स्क्रीनिंग:
निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी (दिवस) आयोजित केली जाईल.
बाहेरच्या उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी गरज भासल्यास त्यांच्या स्वत:च्या खर्चाने निवास व राहण्याची व्यवस्था करावी.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा