⁠
Uncategorized

भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था

अभ्यासाचे घटक

महाराष्ट्र आणि भारत – राज्यव्यवस्था आणि शासन – राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतराज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्कांसदर्भातील मुद्दे इ. (वरील सर्व घटक महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी दिलेल्या अभ्यासक्रमाबाबत आहेत.)

पूर्व परिक्षेला या विषयाचे महत्व

पूर्व परिक्षेला हा विषय साधारणतः १० ते १२ प्रश्‍नांसाठी विचारला जातो. आपले शालेय पुस्तकांचे व एखाद्या संदर्भ पुस्तकाचे वाचन व्यवस्थीत झाले असेल तर हा विषय हमखास पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो.
माझ्या मते राज्यघटना या विषयासाठी खुप पुस्तके वाचणे आवश्यक नाही तर एकच पुस्तक पुन्हाःपुन्हा वाचणे आवश्यक आहे कारण तुम्ही कोणतेही राज्यघटनेचे पुस्तक वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की, सर्व पुस्तकांमध्यें ५ ते १० टक्क्यांच्या फरकांनी सारखीच माहिती आहे. (मी हे केवळ राज्यघटना या विषयाबाबतच सांगत आहे)

आपल्या विषयाची तयारी कशी कराल ?

वरील अभ्यासाचे घटक वाचून चांगले समजून घ्या, म्हणजेच प्रत्येक घटकात नेमका कशाचा समावेश आहे हे तुम्हाला समजेल. आयोगाने विचारलेल्या प्रश्‍नाचे वाचन करून स्वतः विश्‍लेषण करा. बाजारामध्ये असे विश्‍लेषण केलेले पुस्तके आहेत पण माझ्या मते स्वतः विश्‍लेषण केल्याने अभ्यासात नेमकेपणा येण्यास मदत होईल. येथे तुम्हाला कदाचित काही प्रश्‍नांची पुस्तके माहित नसतील पण माननीय आयोगाने नेमके कसे प्रश्‍न विचारले आहेत व कोणत्या काठीण्य पातळीचे विचारले आहेत हे समजून घेण्यास मदत होईल. आणि तुम्ही त्या प्रश्‍नांच्या स्वरूपानुसार आणि काठीण्य पातळीनुसार तयारी कराल.

पुस्तक वाचन करतांना

१) प्रथम वाचन करताना महत्वाच्या मुद्यांना अधोरेखीत करा. (नोट्स काढू नका) एक प्रकरण वाचून झाल्यानंतर अधोरेखीत केलेल्या मुद्यांना पुन्हा वाचून घ्या. आणि आता पुढील नविन प्रकरण वाचुन झाल्यावर त्यालादेखील असेच करा. पुर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर सर्व पुस्तकातील अधोरेखीत केलेले मुद्दे पुन्हा वाचून घ्या. म्हणजेच पुस्तकाचा थोडक्यात व चांगला सार तुमच्या लक्षात येईल.
२) दुसर्‍यांदा पुस्तके वाचन करतांना पुन्हा नवीन मुद्दे लक्षात येतील तसे त्यांना देखील नव्याने अधोरेखीत करा. व ते प्रकरण वाचून झाल्यानंतर पुर्वीच्या अधोरेखीत ओळी व नवीन अधोरेखीत ओळी पुन्हा वाचा.
३) वरील पद्धतीने दोन वेळा पुस्तक वाचून झाल्यावर व अधोरेखीत केलेले मुद्दे वाचून झाल्यावर आता लक्षात न राहणार्‍या मुद्दयांचा किवा घटकांच्या नोट्स काढा.
४) नोट्सची रिव्हीजन करा.
५) आयोगाच्या प्रश्‍नांव्यतिरिक्त नवीन सरावाचे प्रश्‍न वेळ लावून सोडवल्यास तुमच्याकडून होणार्‍या चुका टाळल्या जावू शकतात. आता जे प्रश्‍न चुकलेले आहेत किंवा जमलेले नाहीत त्यांच्याशी संबंधित मुद्दे पुन्हा पुस्तकातून वाचून घ्या.

शालेय व संदर्भ पुस्तकांची यादी

१. ६ वी ते १२ वी महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तके
२. भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया – खंड १(तुकाराम जाधव व महेश शिरापूरकर) Click Here For Buy Now
३. भारतीय संविधान व भारतीय राजकारण- भाग १(तुकाराम जाधव व महेश शिरापूरकर) Buy Now
४. भारतीय संविधान व भारतीय राजकारण- भाग २(तुकाराम जाधव व महेश शिरापूरकर) Buy Now
(टिप – भाग १ व २ पूर्व व मुख्य परिक्षेसाठी उपयुक्त)
५. Indian Polity – M. Laxmikant | Buy Now
६. आपली राज्यघटना – सुभाष कश्यप | Buy Now

२०१३ ते २०१७ घटकनिहाय आयोगाने विचारलेले प्रश्‍न

[table id=11 /]

आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्‍नांचे विश्‍लेषण

२०१७ : प्रश्‍न – नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आलेली आहेत?
अ) ग्रामपंचायतीचे संघटन करणे. ब) उत्पन्नातील विषमता कमी करणे.
क) देशाचे संरक्षण करणे ड) लष्करी सेवा बजावणे.
ई) समान नागरी कायदा निश्‍चित करणे फ) सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.

१) फक्त अ, ब आणि क २) फक्त ब, ड आणि ई
३) फक्त ड, ई आणि ब ४) फक्त क

उत्तर – पर्याय क्र. ४

१) स्पष्टीकरण – भारतीय राज्यघटनेमध्ये ४२ वी घटनादुरूस्ती १९७६ नुसार १० कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि नंतर ८६ वी घटनादुरूस्ती २००२ नुसार आणखी एका कर्तव्याची भर घालण्यात आल्यामुळे सध्या घटनेमध्ये एकूण ११ कर्तव्ये आहेत. पर्याय क्र. अ – ग्रामपंचायतीचे संघटन करणे (कलम ४०) पर्याय क्र. ब – उत्पन्नामधील विषमता कमी करणे
(कलम ३८) पर्याय क्र. ई – समान नागरी कायदा निश्‍चित करणे. (कलम ४४) ही मार्गदर्शक तत्वे भाग ४ कलम ३६ ते ५१ मध्ये नमुद आहेत. पर्याय ड मध्ये लष्करी सेवा बजावणे असा उल्लेख आहे. मात्र मुलभूत कर्तव्यामध्ये लष्करी सेवा असा उल्लेख नसून देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे असा आहे, पुढे पर्याय क्रमांक फ मध्ये सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे यांचा समावेश कर्तव्यांमध्ये नसून घटनेतील कलम ३२६ नुसार घटनात्मक अधिकार आहे.

मुलभूत कर्तव्यांची यादी पुढीलप्रमाणे

१) राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा आदर करणे, संविधानाचे पालन करणे.
२) राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आर्दशाची जोपसना करून त्यांचे अनुसरण करणे.
३) देशाचे सार्वभौमत्व, एैक्य व अखंडत्व उन्नत राखने व त्यांचे संरक्षण करणे.
४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे.
५) अखिल भारतीय जनतेत एकोपा आणि बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथा सोडुन देणे.
६) आपल्या समिश्र संस्कृतीच्या वारश्याचे मोल जाणून तो जतन करणे.
७) नैसर्गीक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्याणवर भुतदया बागळणे.
८) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे.
९) सार्व. संपत्तीचे रक्षण करणे, हिंसांचाराचा निग्रहपुर्वक त्याग करणे.
१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तीगत व सामुदायीक कार्यक्षेत्रात पराकष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.
११) ६ ते१४ वयोगटातील मुलांना प्राथ. शिक्षणांची संधी उपलब्ध करून देणे.

२०१६ – प्रश्‍न – खालील विधाने विचारात घ्या.
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच सदस्य असले पाहिजे.
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होवू शकते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
१) फक्त अ २) फक्त ब ३) दोन्ही अ आणि ब ४) दोन्ही नाहीत

उत्तर – पर्याय क्र. ३

स्पष्टीकरण – भारताने जरी ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनप्रणाली स्विकारली असली तरी ती अगदी जशीच्या तशी स्विकारलेली
नाही. ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स (कनिष्ठ सभागृह) व हाऊस ऑफ लॉर्ड्स (वरीष्ठ सभागृह) यांची मिळवून संसद बनलेली आहे यापैकी पंतप्रधान हे केवळ कनिष्ठ सभागृहाचे म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असण्याची तरतूद आहे. भारतामध्ये लोकसभा (कनिष्ठ सभागृह) व राज्यसभा (वरीष्ठ सभागृह) संसद या दोन सभागृहाची मिळून बनलेली आहे. भारताचे पंतप्रधान हे यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणे आवश्यक आहे. मात्र एखादा व्यक्ती कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य नसतांना देखील पंतप्रधान बनू शकतो. यासाठी त्याने सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व स्विकारणे बंधनकारणक आहे.

सराव प्रश्‍न –

१) खालीलपैकी विधाने लक्षात घ्या ?
अ) मुलभूत कर्तव्याची सक्ती करता येते.
ब) घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर, १९४६ ला भरले.
क) मुलभूत कर्तव्य फ क्त भारतीय नागरिकांना लागू होतात .
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
१) फ क्त अ २) फ क्त क ३) ब आणि क ४) वरील सर्व

२) खालील विधाने लक्षात घ्या ?
अ) कलम १४ – कायद्यासमोर सर्व समान
ब) कलम १७ – अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
१) अ, आणि ब २) फ क्त ब ३) फ क्त अ ४) वरीलपैकी नाही

३) खालील विधाने लक्षात घ्या ?
अ) मसूदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ रोजी करण्यात आली.
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तिचे अध्यक्ष होते.
क) बी.एल. मीत्तर हे घटना समितीचे सदस्य होते
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
१) फ क्त अ २) अ आणि ब ३) अ, ब, क ४) फ क्त क

४) भारतीय राज्यघटनेने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिलेले आहे ?
१) एकेरी नागरिकत्व २) दुहेरी नागरिकत्व ३) बहु नागरिकत्व ४) वरीलपैकी नाही

५) खालीलपैकी घटना समितीमध्ये असलेल्या महिलांची नावे दिलेली आहेत. यापैकी कोण बिगर काँग्रेसच्या महिला सदस्या होत्या.
अ. दुर्गाबाई देशमुख ब. कमला चौधरी क. अ‍ॅनी मर्कटसन
ड. पौर्णिमा बॅनर्जी इ. रेणूका रे ई. बेगम रसुल
१) अ, क, ड, इ २) ब, ड, ई ३) क, इ, ई ४) अ,क,इ

६) खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य नाही ?
अ. कलम १५ नुसार भेदभावास प्रतिबंध याला अपवाद म्हणजे राज्यसंस्थेला निवासाची अट घालता येते.
ब. कलम १६ नुसार सार्वजनिक नोकर्‍यामध्ये समान संधी याला अपवाद म्हणजे राज्यसंस्था महिला आणि बालकांसाठी विशेष
तरतुदी करू शकते.
क. कलम १७ अस्पृश्यता निवारण हे समानतेच्या अधिकारामधील सुवर्ण कलम आहे.
१) केवळ अ २) केवळ ब ३) केवळ क ४) अ व ब

७) खालीलपैकी कोणते राष्ट्रपती पूर्वी उपराष्ट्रपती नव्हते.
अ. फ क्रुद्दीन अली अहमद ब. शंकर दयाळ शर्मा क. व्ही. व्ही.गिरी ड. ग्यानी झैल सिह
१) अ आणि ब २) ब आणि ड ३) अ आणि ड ४) अ आणि क

८) विधान अ : स्थगन प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडला जातो.
कारण ब : विश्‍वास दर्शक ठराव राज्यसभेत मांडला जात नाही.
१) अ व ब दोन्हीही विधाने बरोबर असुन ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२) अ व ब दोन्हीही विधाने बरोबर असुन ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३) विधान अ बरोबर व ब चुकीचे आहे.
४) विधान अ चुकीचे व ब बरोबर आहे.

९) न्यायधीशांना पदावरून दूर करण्याच्या पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ. त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर लोकसभेच्या व राज्यसभेच्या किमान ५० सदस्यांनी असा प्रस्ताव सभापतींना सादर करणे गरजेचे असते.
ब. असा प्रस्ताव केवळ राज्यसभेने विशेष बहुमाताने संमत करणे गरजेचे असते.
क. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची चौकशी निवडणूक आयोगाकडून पार पाडली जाते.
१) केवळ अ व ब २) केवळ ब व क ३) केवळ अ व क ४) यापैकी नाही

१०) खालीलपैकी संघराज्यीय पध्दतीची कोणती वैशिष्टे आहेत ?
अ) सत्ता विभाजन ब) दुहेरी शासन व्यवस्था क) लिखित राज्यघटना ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था
१) अ, ब,क २) ब, क , ड ३) अ, क, ड ४) वरील सर्व

वरील प्रश्नांची उत्तरे

१ – ३
२ – १
३ – ३
४ – १
५ – ३
६ – ३
७ – ३
८ – २
९ – ४
१० – ४

 

लेखक – गणेश थोरात, द युनिक अ‍ॅकॅडमी
Email – ganesha24x7@gmail.com
मो. नं. ९७६७३७०२९०

Related Articles

3 Comments

Back to top button