एअरफोर्सने प्रथमच सुपरसॉनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइलची टेस्ट केली आहे. बुधवारी बंगालच्या खाडीमध्ये सुखोईद्वारे याचा मारा करण्यात आला. ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आहे. त्याचा वेग 2.8-3.0 मॅक (3675-3430 Kmph)आहे. ब्रह्मोस हे नाव ब्रह्मपुत्र (भारत), मसक्वा (रशिया) च्या नद्यांपासून मिळाले आहे. ब्रह्मोसची रेंज- 290 KM आहे. वजन- 3000 Kg, लांबी- 8 M, रुंदी – 0.6 M आहे. 300 Kg पर्यंतचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे. ब्रह्मोस मिसाइल सबमरीन, शिप, एअरक्राफ्ट, जमिनीवरून लाँचिंग शक्य आहे. भारत-रशियाच्या जॉइंट व्हेंचर ब्रह्मोस एअरस्पेसद्वारे निर्मिती केली असून हैदराबाद, तिरुवनंतपुरममध्ये ब्रह्मोस एअरस्पेस सेंटर आहे.