⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदाच्या 690 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77

शैक्षणिक पात्रता?
मुंबई महापालिकेनं सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी,पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष असावी. तसेच सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल
परीक्षा फी –
किती पगार मिळेल?
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला महिना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.
दुय्यम अभियंता (स्थापत्य) – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४४,९०० ते १,४२,४०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.
यानंतर दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)- या पदावर भरती झालेल्या उमेदवारास महिना ४४,९०० ते १,४२,४०० आणि भते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
शॉर्ट भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article