मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. फक्त चौथी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 आहे.
पदाचे नाव : स्वयंपाकी / Cook
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. 02) उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 200/- रुपये
पगार (Pay Scale) : सदर पदाची वेतन मेट्रिक्स 15,000/- रुपये ते 47,600/- व भत्ते अशी आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 27 मार्च 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.
पात्र उमेदवारीकरीताच्या अटी :-
तो / ती करार करणेस सक्षम असावा/ असावी. त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
त्याला / तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या /तिच्याविरूध्द फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी नसावी
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००५ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी
उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित (Self-attested) केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात.
१) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
२) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
३) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
४) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
५) स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला ६. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
७) सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
८) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
९. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी
१०) उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
११) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
१२) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी
अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा