---Advertisement---

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी

By Saurabh Puranik

Published On:

rahul_gandhi
---Advertisement---

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमात मतदानासाठी १६ डिसेंबरची तारीख आहे. पण अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार उभे असल्याने मतदान होणार नाही यामुळे अध्यक्षपदी नियुक्तीचे अधिकृत प्रमाणपत्र १६ डिसेंबर रोजी दिले जाईल. यासोबतच सोनिया गांधी यांचा पक्षात अध्यक्ष म्हणून तब्बल १९ वर्षांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे.
राहुल हे अध्यक्षपद सांभाळणारे नेहरू-गांधी कुटुंबाचे सहावे व काँग्रेसचे ६० वे सदस्य असतील. अाई साेनियांच्या जागी त्यांची नेमणूक हाेईल. १३२ वर्षे जुन्या काँग्रेसमध्ये साेनियांनी सर्वाधिक १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले. तसेच गांधी कुटुंबात सर्वाधिक काळ खासदार राहिल्यानंतर राहुल यांच्याकडे अाता ही जबाबदारी येईल. यापूर्वी इंदिरा गांधींची १९५९ मध्ये काँग्रेस अध्यक्षा म्हणून निवड झाली हाेती; परंतु त्या १९६७ मध्ये खासदार प्रथमच बनल्या. याशिवाय राजीव गांधी १९८१ मध्ये खासदार, तर १९८५ मध्ये अध्यक्ष बनले. साेनिया गांधी १९९८ मध्ये अध्यक्ष बनल्या, तर १९९९ मध्ये प्रथम लाेकसभेवर निवडून अाल्या हाेत्या.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now