---Advertisement---

Current Affairs 10 May 2019

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

इराणकडून होणारी तेल आयात पूर्ण बंद

  • अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
  • भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या हसन रूहानी राजवटीवर विशेषत: इराणी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कच्च्या तेलाबाबत आणि इतरही अनेक निर्बंध लादले होते. यानंतर, आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी इराणवर अवलंबून असलेल्या सात देशांना अमेरिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांची सवलत दिली होती.
  • ‘सिग्निफिकंट रिडक्शन एक्झेम्प्शन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या सवलतीची मुदत २ मे रोजी संपली. ज्यांच्याबाबत आधीच करार झाले होते, त्यातील काही तेल अद्याप यायचे आहे.

मिलिंद रेगे मुंबई क्रिकेटच्या निवड समितीचे अध्यक्ष

  • आगामी क्रिकेट हंगामासाठी मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, महिलांच्या निवड समितीचे प्रमुखपद माजी क्रिकेटपटू वृंदा भगत यांच्याकडे देण्यात आले आहे.

स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररचा टेनिसला अलविदा

  • रशियाच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध खेळताना पराभव पत्करावा लागल्यानंतर स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेतच टेनिसला अलविदा केला.
  • जागतिक क्रमवारीत अव्वल पाचव्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या फेररने माद्रिद खुली स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते.

जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या जहाजांसमवेत भारताच्या जहाजांची सामुहिक सफर

  • जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांनी दक्षिण चीनी समुद्रात एकत्रित गट जल सफर केली. 3 मे ते 9 मे पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात चार देशांमधल्या सहा लढाऊ नौका सहभागी झाल्या.
  • भारताची आयएनएस कोलकाता या विनाशिकेसह आयएनएस शक्ती, जपानची हेलिकॉप्टरवाहू जेएमएसडीएफ इझुमो, जेएनएसडीएफ मुरासामे ही विनाशिका यांच्यासमवेत फिलीपीन्स आणि अमेरिकेची विनाशिका आणि लढाऊ नौकांचा यात समावेश होता.
  • सहभागी राष्ट्रांची भागीदारी अधिकारी दृढ करणे आणि सहभागी राष्ट्रांच्या नौदलात परस्पर सामंजस्य वृद्धींगत करणे हा यामागचा उद्देश आहे.

बालाकोटमध्ये १७० दहशतवादी ठार : इटालियन पत्रकाराचा दावा

  • पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत १७० दहशतवादी ठार झाल्याचा दावा करणाऱ्या इटलीच्या पत्रकार फ्रान्सेस्का मरीनो यांनी केला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now