चालू घडामोडी – १३ मार्च २०१६
देश
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींचा निधी chalu ghadamodi 13 march 2016
तेलंगण राज्य सरकार यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समुदायावरील कल्याणकारी योजनांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याचे वृत्त आहे. ब्राह्मणांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अधिकाधिक सकारात्मक पाऊले उचलणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिले होते.
देशात बारा लाख लोक कॅन्सरच्या जबड्यात
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार भारतात सन २००८ च्या तुलनेत सन २०१६ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत ७.५ टक्के वाढ झाली आहे. भारतात १२ लाख लोक कर्करोगाने ग्रस्त आहेत. गेल्यावर्षीअखेर १० लाख लोकांना कर्करोग झाला, पैकी ६ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सिगारेट ओढणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण असल्याचे समप्रमाण सिद्ध झाले आहे. तोंडाचा, ओठाचा, पोटाचा, आतड्यांचा कर्करोग होण्याचे भारतातील प्रमाण सर्वाधिक आहे.
विमानप्रवासात मृत्यू, दुखापतींबद्दल भरपाईत वाढ
विमान प्रवासात प्रवाशांची झालेली हानी भरुन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्याचा ठराव राज्यसभेत मंजुर झाला आहे. लोकसभेत पुर्वीच हा ठराव मंजुर झाला आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळून हा कायदा अस्तित्वात आला तर देशातील विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दराने नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. महागाई दराच्या आधारावर पाच वर्षातून एकदा इंटरनॅशनल सिव्हील एविएशन ऑरगायनेझशनकडून नुकसान भरपाई मर्यादेत बदल केले जातात.
अर्थशास्त्र
नवउद्यमी धोरणात भारत चौथा current affairs 13 march 2016
तांत्रिक नवउद्यमी धोरणात जगात भारताचा चौथा क्रमांक लागत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल यांच्यानंतर भारतातच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तांत्रिक नवउद्यमी धोरण राबवले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅडव्हान्सिंग एशिया’ या परिषदेत बोलतांना सांगितले.
कर्जबुडव्यांवर ‘सेबी’चे कठोर र्निबध
गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी सेक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या नियामक संस्थेने कर्जबुडव्या कंपन्या आणि व्यक्तींवर कठोर र्निबध लागू केले. कर्जबुडव्या घटकांना सार्वजनिक पैशातून निधी उभारण्यास तसेच अधिकार पदांवर राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याचबरोबर आर्थिक तपासणी अहवालाचा परिणाम स्वतंत्र कागदपत्राद्वारे प्रसिद्ध करणे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे. रोखे आणि वस्तू बाजारांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी देखरेख यंत्रणा बळकट करण्यावर सेबी भर देणार आहे.
जनधन योजनेतील 28 टक्के खाती निष्क्रिय
नवी दिल्ली: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे. मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते हे केवळ सरकारी अनुदान किंवा लाभ मिळवण्यासाठी आहे या गैरसमजातून एका व्यक्तीच्या नावाने दोन खाती उघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार समितीकडे todays gk in marathi 13 march 2016
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात रिझव्र्ह बँक कायद्यात (१९३४) सुधारणा करून वित्तीय धोरण विषयक समिती नेमण्याची घोषणा केली होती. व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार आता समितीला मिळाले आहेत. यापूर्वी हे अधिकार फक्त बँकेच्या गव्हर्नरला होते. आरबीआयच्या गव्हर्नरसह सरकारने नेमलेल्या तीन उमेदवारांचा समावेश असलेली ही सहा जणांची समिती आता व्याजदर ठरवू शकणार आहे आहे. समितीमध्ये उर्वरित तीन सदस्य बँकेचे असून गव्हर्नर हा पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी-गव्हर्नर वित्तीय धोरणाचे प्रमुख असतील तर सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक सदस्य असेल. प्रत्येक सदस्याला एक मत असेल आणि समान मते पडल्यास निर्णायक मताचा अधिकार आरबीआयच्या गव्हर्नरला असेल.
क्रीडा
मुष्टियोद्धा विजेंदर सिंग विजयी spardha pariksha chalu ghadamodi 13 march 2016
भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंगने आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. विजेंदरने हंगेरीचा मुष्टियोद्धा अलेक्झांडर होर्वार्थला तीन फेऱ्यांमध्ये नॉकआउट केले. आपण सापाचे विष पिऊन रिंगणात उतरत असल्याचे होवार्थने यापूर्वी म्हटले होते. विजेंदरसिंगचा हा सलग चौथा विजय आहे.