Current Affairs 19 November 2019
राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली
– दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भारतीय संसदेच्या राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे 250 वे अधिवेशन आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे.
– राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वर्तमानात उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती आहेत.
– मागील २५० सत्रांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरं पाहिली, राज्यसभेची २५० सत्रं म्हणजे एक विचारधारा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या २५० सत्रानिमित्त त्यांनी राज्यसभेला संबोधित केलं. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला आहे, इतिहास घडताना पाहिला आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी या सदनाचे नेतृत्त्व केलं आहे ही बाबही अभिमानास्पद आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आत्तापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे असं मोदी म्हणाले.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी समाजात विश्वासाची भावना रुजवण्याची गरज – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
– देशात मंदीसदृश वातावरण निर्माण होण्यास सध्याच्या सरकारच्या काळात विश्वास गमावल्याने उसवत गेलेला सामाजिक सलोखा हे प्रमुख कारण असल्याचे मत माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी ‘दी हिंदू ’ या वृत्तपत्रातील लेखात व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली असून ती सुधारण्यासाठी मोदी सरकारने द्वेषमूलक पद्धतीचा त्याग केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
– संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असताना प्रसिद्ध झालेल्या या लेखात ते म्हणतात, की प्रतीकात्मक आर्थिक विकास दर हा गेल्या १५ वर्षांत नीचांकी आहे, बेरोजगारीचा दर ४५ वर्षांत सर्वाधिक झाला आहे, कुटुंबाचा खर्च चार दशकांत सर्वात कमी नोंदला गेला आहे. ही सगळी देशाच्या आजारी होऊ लागलेल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. या घसरणीमागची कारणे खोलवर शोधली तर ती सामाजिक एकोप्याच्या उसवलेल्या धाग्यात आहेत. त्यावर उपाय म्हणून सरकारने पक्षपाती व द्वेषमूलक धोरणाला तिलांजली दिली पाहिजे.
ऑस्ट्रेलियाच्या एमिली स्मिथवर एका वर्षाची बंदी
– ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर काही महिन्यांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे स्मिथसह इतर दोन खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. आता ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एमिली स्मिथ हिच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली आहे. वुमन्स बिग बॅश लीग (WBBL) स्पर्धेत होबार्ट हरिकेन संघाकडून खेळणाऱ्या स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.