Current Affairs 19 November 2022 : स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून 19 नोव्हेंबर 2022 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी खालीलप्रमाणे आहेत
राष्ट्रीय चालू घडामोडी
भारताने श्रीहरिकोटा येथून स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेले विक्रम-सबर्बिटल या खाजगीरित्या विकसित केलेले पहिले रॉकेट प्रक्षेपित केले.
18-19 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय कॉन्फरन्स ऑन टेररिझम फायनान्सिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
18 नोव्हेंबर रोजी 5 वा निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला
पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी लुधियाना येथे निधन झाले
आर्थिक चालू घडामोडी
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सीईओ आणि एमडीचा कमाल कार्यकाळ 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारांसाठी पहिला जागतिक दिवस 18 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
डच न्यायालयाने तीन MH17 संशयितांना दोषी ठरवले, एकाची निर्दोष मुक्तता
क्रीडा चालू घडामोडी
दक्षिण कोरियामध्ये आशियाई एअरगन चॅम्पियनशिप: रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू यांनी एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले













