1) मक्कल निधी मय्यम: कमल हसनचा नवीन पक्ष
अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक कमल हसन यांनी तामिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’हा नवीन पक्ष स्थापन केला. हिंदीत त्याचा अर्थ लोक न्याय मंच असा होतो.
दाेन चित्रपट अभिनेते सुमारे २४ वर्षे हाेते मुख्यमंत्री
– एम.जी.रामचंद्रन : मुख्यमंत्री बनणारे पहिले चित्रपट अभिनेते. १९५३मध्ये द्रमुकमध्ये प्रवेश, तर १९७२मध्ये अण्णाद्रमुकची स्थापना. १९७७मध्ये प्रथम मुख्यमंत्री बनले. १० वर्षे या पदावर हाेते.
– जे.जयललिता : १९८२मध्ये एमजीअार हे मुख्यमंत्री असताना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. १९८७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पक्षप्रमुख बनल्या. १९९१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड झाली. ५ कार्यकाळात १४ वर्षे मुख्यमंत्री हाेत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणानंतरही पदावर.
2) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील प्रोजेक्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये उभारलेल्या ट्रम्प टॉवर्सच्या दुस-या बिल्डिंगमध्ये बुधवारी उद्घाटन केले. पंचशील डेव्हलपर्सच्या मदतीने उभारलेला हा देशातील दुसरा ट्रम्प टॉवर आहे. पंचशील ग्रुपचे चेयरमन अतुल चोरडिया यांनी दावा केला आहे की, 23 मजली ही इमारत सर्वात आलिशान आणि देशातील पहिली इको फ्रेंडली इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये ऋषी कपूरपासून कॅटरीना कैफपर्यंतचे फ्लॅट्स आहेत.
ट्रम्प यांचा भारतातील पहिला प्रोजेक्ट
ही बिल्डिंग न्यूयॉर्कमधील रियल एस्टेट टायकून व राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची आहे. ट्रम्प यांचा हा भारतातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. ट्रम्प ब्रॅंडचा हा प्रोजेक्ट प्रसिद्ध बिल्डर ग्रुप पंचशील बनवित आहे. पंचशील ग्रुपने पुण्यात यापूर्वीही अनेक मोठे प्रोजेक्ट्स तयार केले आहेत. पुण्याशिवाय डोनॉल्ड ट्रम्पची कंपनी ‘ट्रम्प ऑर्गेनायजेशन’ ने मुंबईत लोढा ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. लोढा ग्रुप मध्य मुंबईतील वरळी भागात 75 मजली रहिवासी टॉवर्स उभा करीत आहे. वरळीतील ट्रम्प टॉवर्समधील 400 फ्लॅट्सपैकी जवळपास बहुतेक फ्लॅट्स विकले गेले आहेत. ट्रम्प ऑर्गनायझेशनने काही भारतीय बिल्डर्सला स्वत:चे नाव वापरण्याचे लायसन्स दिले आहे.
3) एप्रिल-डिसेंबरदरम्यान एफडीआयमध्ये 2,31,457 कोटींची विदेशी गुंतवणूक
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) केवळ ०.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. आैद्योगिक धोरण तसेच संवर्धन विभागानुसार (डीआयपीपी) एप्रिल ते डिसेंबर २०१६ मध्ये ३५.८४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती. ही २०१७ मध्ये वाढून केवळ ३५.९४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. रुपयाच्या दृष्टीने या ९ महिन्यांत २,३१,४५७ कोटींची विदेशी गुंतवणूक आली. वर्षभरापूर्वीच्या २,४०,३८५ कोटींच्या तुलनेत ही चार टक्के कमी आहे. डीआयपीपी वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यात सर्वाधिक १७ टक्के गुंतवणूक दूरसंचार क्षेत्रात झाली आहे.
4) खासगी कंपन्यांना कोळसा खाणींची परवानगी
कोळसा खाण प्रकरणात कोल इंडियाची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. सरकारने देशी-विदेशी खासगी कंपन्यांना कोळशाचे खनन करून त्याची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत केवळ वीज आणि अॅल्युमिनियमसारख्या क्षेत्रातील खासगी कंपन्यांना स्वत:च्या वापरापुरते (कॅप्टिव्ह) खनन करण्याची परवानगी होती. कॅप्टिव्हव्यतिरिक्त इतर वापरासाठी कंपन्यांना कोल इंडियाकडूनच कोळसा खरेदी करावी लागत होता. सध्या देशातील ८० टक्के उत्पादन कोल इंडिया करते. १९७३ मध्ये कोळशाचे राष्ट्रीयीकरण करण्यात अाले होते. त्यानंतर या क्षेत्रात झालेला हा सर्वात मोठा बदल आहे.सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१४ मध्ये २०४ कोळसा खाणींची प्रक्रिया रद्द केली होती. या खाणी १९९३ पासून सरकारी आणि खासगी कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी मार्च २०१५ मध्ये नवीन विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.
5) लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी
भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील आहे. 25 वर्षीय अवनीने आपलं प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केलं आहे. महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी 2016 मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केलं होतं.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.