⁠  ⁠

चालू घडामोडी : २२ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 22 July 2020

अर्थउभारीसाठी EU चं ७५० अब्ज युरोचं पॅकेज

EU COuncil
 • युरोपियन महासंघची संपलेली बैठक ही आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक असल्याचं म्हटलं जात आहे.
 • फ्रान्स २४ ने एफपी, एपी आणि रॉयटर्सच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या बैठकीदरम्यान तब्बल १ हजार ८०० अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, पुढील सात वर्षांसाठी युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीसाठी हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यापैकी ७५० अब्ज युरोंची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या रूपात देण्यात येणार आहे.
 • दोन भागांमध्ये विभाजन
 • २७ देश असलेला युरोपियन महासंघ या शिखर परिषदेत दोन भागांमध्ये विभागलेला पाहायला मिळाला. एकीकडे नेदरलँड, ऑस्ट्रिया, डेनमार्क आणि स्वीडनसारखे देश होते. त्यांना फ्रुगल फोर म्हणून ओळखलं जातं.
 • तर यामध्ये फिनलँडनंदेखील त्यांचीच साथ दिली. हे पाच देश कमी अनुदान आणि कर्ज घेण्याच्या बाजूने होते. तसंच त्यांना ज्यामुळे देशांना कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होती अशा अटीही लावण्याच्या तयारीत हे देश होते. अशातच पोलंड आणि हेंगेरीसारख्या देशांना संकटाचा सामना करावा लागला असता.
 • युरोपचा मार्शल प्लॅन
 • स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी हा युरोपसाठी मार्शल प्लॅन असल्याचं म्हटलं. तसंच पुझील सहा वर्षांमध्ये यामुळे स्पेनची अर्थव्यवस्थेला १४० अब्ज युरोंचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

ICC Rankings : स्टोक्स अष्टपैलूंच्या यादीत अव्वल

Ben Stokes will have no private life after this, Botham says ...
 • वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली.
 • ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला.
 • अष्टपैलूंच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. तसेच अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. ही स्टोक्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक- सेरी-ए फुटबॉल स्पर्धा :

 • अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला 2-1 नमवले.
 • रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.
 • या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
 • रोनाल्डोने 51व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर 54व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला:

 • ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
 • भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.
 • सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त 30 मिनिट लागली.
 • सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली.

Share This Article