चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर २०१९

Current Affairs 28 October 2019

भारत, नेपाळ, भूतान या देशांच्या सीमेवर ‘वन्यजीवन संरक्षण उद्यान’ तयार करण्याची योजना

– सीमेवरील वन्यजीवन संरक्षण ‘शांती उद्यान’ तयार करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान या देशांनी एक योजना तयार केली आहे आणि त्याच्या संदर्भात एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

– भारताच्या पुढाकाराने इतर दोन्ही देशांनी प्रस्तावित उद्यानात तीन देशांच्या लगतच्या परिसरातल्या समृद्ध जैवविविधतेचा समावेश असणार आहे.

– या परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांना स्थलांतरणासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध व्हावे आणि त्यात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण व्हावी नाही यासाठी हा कायदा वन्यजीवांच्या संरक्षणार्थ अधिक फायदेशीर ठरणार आहे.

– भारत आणि भूतान या देशांच्यामध्ये यापूर्वीच एक वन संरक्षित क्षेत्र असून त्यामध्ये आसाम राज्यामध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. नवीन त्रिपक्षीय प्रकल्पामुळे हा मानस राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार ठरणार आहे.

कुपोषणाच्या विरोधात UNWFPच्या ‘फीड अवर फ्यूचर’ मोहीमेचा प्रारंभ

जागतिक अन्न दिनानिमित्त २१ ऑक्टोबर२०१९ रोजी भारतात उपासमार व कुपोषण या गंभीर बाबींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) ‘फीड अवर फ्यूचर’ नावाच्या सिनेमा जाहिरात मोहीमेचा प्रारंभ केला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

– या मोहिमेच्या प्रारंभामध्ये टीव्ही होस्ट मिनी माथुर यांच्याकडून संचालित सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चासत्र आयोजित केले जाणार.

– शून्य उपासमारीचे जग तयार करण्याच्या उद्देशाने UFO मूव्हीज संस्थेच्या पाठिंब्याने हे अभियान चालवले जाणार आहे.

– WFPचे ‘शेयर द मील’ हे जागतिक उपासमारी विरोधातले जगातले पहिले मोबाइल अॅप जाहीर करण्यात आले आहे.

– अ‍ॅप वापरकर्त्यांना लहान देणग्या देता येणार आणि त्यातल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करते.

पार्श्वभूमी

– २०१८ साली फेसबुक, ग्लोबल सिनेमा अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (SAWA) आणि WFP यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

– सर जॉन हेगर्टी ह्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपटाची शक्ती वापरण्याची संकल्पना मांडली होती.

– जाहिरातीच्या माध्यमातून डिजिटल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देणग्या देण्यासाठी देणगीदारांना प्रवृत्त करणे हा त्या संकल्पनेचा हेतू होता.

UNWFP बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) ही अन्न-पुरवठा संदर्भात सहाय्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक शाखा असून ती जगातली सर्वात मोठी मानवतावादी संघटना आहे जी उपासमारी व अन्न सुरक्षा अश्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देते. संस्थेची स्थापना १९ डिसेंबर १९६१ रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.

संस्था दरवर्षी ८३ देशांमधल्या सरासरी ९१.४ दशलक्ष लोकांना अन्न पुरवठा करून मदत करते. ही संस्था अशा लोकांना मदत करते जे स्वत: आणि त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची (UNDG) सदस्य आणि त्याच्या कार्यकारी समितीचा एक भाग आहे.

उत्तरप्रदेश राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’

दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ रोजी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नव्या ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ची घोषणा केली.

ठळक मुद्दे

– राज्यातल्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

– ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला त्या प्रत्येकाला 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार.

– रक्कम DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

– योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केली जाणार आहे. मुलीचे लसीकरण, इयत्ता १, ५, ९ व पदवी मधील त्यांचा प्रवेश असे विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर रक्कम दिली जाणार.

– योजनेसाठी डिजिटल व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेश राज्य

– उत्तरप्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. लोकसंख्येनुसार उत्तरप्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. लखनऊ ही राज्याची राजधानी तर कानपूर हे राज्यातले सर्वात मोठे शहर आहे. राज्याची स्थापना २६ जानेवारी१९५० रोजी झाली.

५५ हजार विद्यार्थ्यांसह लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूल जगातली सर्वात मोठी शाळा

लखनऊ (उत्तरप्रदेश) मधले सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) ही शाळा ‘जगातली सर्वात मोठी शाळा’ ठरली आहे. २०१९-२० या वर्षी ५५,५४७ विद्यार्थी असलेल्या या शाळेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

– जगदीश गांधी सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) याचे संस्थापक आहेत. फक्त पाच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या शाळेला सुरुवात करण्यात आली होती आज ती सर्वात मोठी शाळा झाली आहे. सध्या संस्थेच्या १८ शाखा आहेत आणि संपूर्ण शहरात जवळपास ५६,००० विद्यार्थी आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बाबत

– गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दरवर्षी प्रकाशित होणारे एक संदर्भ पुस्तक आहे ज्यामध्ये जागतिक विक्रमांचे संकलन केले जाते. सन १९५५ साली स्थापना झाल्यापासून सन २००० पर्यंत याला ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ (अमेरिकेमध्ये) या नावाने ओळखले जात होते. हे पुस्तक ‘सर्वाधिक विकले जाणारे कॉपीराइट पुस्तक’ याच्या रूपात स्वताःच एक विक्रमधारी पुस्तक आहे.

– असे पुस्तक तयार करण्याची संकल्पना सर ह्यूग बीव्हर यांनी मंडळी होती. त्याच संकल्पनेला धरून ऑगस्ट १९५४ मध्ये लंडनमध्ये नोरिस आणि रॉस मॅक’विर्टर या जुळ्या भावांनी या पुस्तकाची स्थापना केली.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Leave a Comment