⁠  ⁠

चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर २०१९

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 29 October 2019

‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे सिकंदराबाद देशातले पहिले रेल्वे स्थानक

– भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले.

– अनेक ऊर्जा बचतीसंबंधी चालविलेले उपक्रम तसेच प्रवाश्यांसाठी दिलेल्या आधुनिक सेवा-सुविधांचा समावेश केल्याने सिकंदराबाद स्थानकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

– सथानकावर CO2 संवेदकाने सुसज्जित वातानुकूलित विश्रामगृह, सौर पटले आणि LED दिव्यांचा वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अश्या विविध यंत्रणा तेथे बसविण्यात आले आहेत.

भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) बाबत

– भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) हा भारतीय उद्योग परिसंघ (CII) याचा एक भाग आहे. त्याची स्थापना २००१ साली झाली.

– यात नवीन ग्रीन बिल्डिंग रेटिंग प्रोग्राम विकसित करणे, प्रमाणपत्र सेवा आणि हरित इमारत प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या विकसनशील पुढाकारांचा समावेश आहे.

बिजींगमध्ये ‘हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक २०१९’ संपन्न

२६ ऑक्टोबर २०१९ रोजी चीनची राजधानी बिजींग येथे २९ वी ‘हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक’ या कार्यक्रमाचा समारोप झाला. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी सभेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

BASIC गट

– २८ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या करारामधून BASIC समूह जन्माला आला, जो ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या चार मोठ्या नव्या औद्योगिक देशांचा एक गट आहे. कोपेनहेगन हवामान परिषदेदरम्यान चारही देशांनी एकत्रितपणे बदलत्या हवामानाच्या विरोधात कार्य करण्यास वचनबद्धता दर्शवली आणि हा गट अस्तित्वात आला.

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे

– अमेरिका पुढच्या वर्षी पॅरिस हवामान करारामधून माघार घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर BASIC देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी कराराच्या ‘व्यापक’ अंमलबजावणीची मागणी केली.

– हवामानविषयक कृती योजनेच्या अंमलबजावणीत होणारे नुकसान कमी करण्यासाठी विकसनशील देशांना १०० अब्ज डॉलर एवढा वित्तपुरवठा करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यास विकसित देशांना आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ १० ते २० अब्ज डॉलर एवढीच रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

– BASIC देशांनी त्यांच्या राष्ट्रीय परिस्थितीच्या आधारे महत्वाकांक्षी हवामान कृती राबवित आहेत आणि त्यात मोठी प्रगती साधली आहे. २०१८ साली चीनने राष्ट्रीय GDPच्या एका युनिट कार्बन डाय-ऑक्साईड वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण २००५ सालाच्या तुलनेत ४५.८ टक्क्यांनी कमी केले आहे तर भारताने याबाबतीत सन २००५ ते सन २०१४ या कालावधीत उत्सर्जनाचे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केले आणि ब्राझीलने हे प्रमाण ५८ टक्क्यांनी कमी केले. दक्षिण आफ्रिकेनी नवा कार्बन कर लागू केला.

सोने विक्री प्रकरणी आरबीआयचे स्पष्टीकरण

– तब्बल तीन दशकांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली असून बँकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचं वृत्त दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणतंही सोनं विकण्यात आलेलं नाही किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही”, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं. अशाप्रकारचं वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.

– ‘आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलंय, तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत १९.८७ दशलक्ष औंस कोटी सोनं होतं. तर, ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये केवळ २६.७ अब्ज डॉलर सोनं होतं’, असं दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटलं होतं.

पंकज कुमार UIDAI चे नवे CEO

– केंद्र सरकारने मोठे प्रशासनिक बदल केले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार यांची UIDAI च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

– तर वरिष्ठ IAS अधिकारी संजीव नंदन सहाय यांची ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुभाष चंद्र गर्ग यांची जागा घेणार आहेत.

– संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गर्ग यांना अर्थ विभागाच्या सचिव पदावरून हटवून ऊर्जा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

– त्यानंतर गर्ग यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. ते सध्या तीन महिन्यांच्या नोटीसवर कार्यरत आहेत. गर्ग हे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

– ब्रज राज शर्मा यांची कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सीमा व्यवस्थापन विभागाच्या सचिवदी कार्यरत आहेत. तर NHAI चे अध्यक्ष नागेंद्र नाथ सिन्हा हे ब्रज राज शर्मा यांची जागा घेणार आहेत. संजीव गुप्ता यांची गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राज्य सचिवालय परिषदेत सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते याच विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article