Current Affairs 3 November 2019
निर्भया निधीतून सर्व पोलीस ठाण्यांत महिला मदत केंद्रे
– निर्भया निधीचा उपयोग देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्रे व सर्व जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागांच्या स्थापनेसाठी करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.
– १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या देश हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर २०१३ मध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती. सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा उद्देश हा निधी स्थापन करण्यात होता.
जम्मू व काश्मीर, लडाख येथे बांबू टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणार
– 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या घोषणेनुसार, नव्याने तयार झालेल्या जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये बांबूच्या शेतीला व्यवसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने तीन ‘बांबू टेक्नॉलॉजी पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू, श्रीनगर आणि लेह येथे हे तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
– जम्मू व काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आणि शेजारच्या पंजाबमधील हिमालयाच्या पायथ्याशी जिल्ह्यात बांबू नैसर्गिकरित्या वाढतात आणि त्या भागात बांबूच्या शेतीचा फायदा घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे.
Olympic Qualifiers Hockey : भारतीय संघाचं मिशन ऑलिम्पिक फत्ते
पुरुष हॉकी
– हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरीस आपलं ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चीत केलं आहे. भुवनेश्वर शहरात पार पडलेल्या सामन्यात भारताने रशियाचा ७-१ ने धुव्वा उडवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने रशियाची झुंज ४-२ अशी मोडून काढली होती. या तुलनेत शनिवारचा सामना एकतर्फी झाला. एकूण गोल फरकांमध्ये ११-३ च्या फरकाने भारतीय संघाने बाजी मारत टोकियोचं तिकीट पक्क केलं आहे.
– ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याची भारतीय हॉकी संघाची ही २० वी वेळ ठरली आहे. आतापर्यंत भारतीय संघाच्या खात्यात ८ सुवर्णपदकं जमा आहेत.
महिला हॉकी
– कर्णधार राणी रामपालने अखेरच्या सत्रात केलेल्या एकमेव गोलच्या आधारावर भारतीय महिलांनी टोकियो ऑलिम्पिकला प्रवेश नक्की केला आहे. भुवनेश्वर शहरात पार पडलेल्या सामन्यात, अमेरिकन महिलांनी भारतीय संघावर ४-१ ने मात केली.
– ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी १९८० आणि २०१६ साली भारतीय महिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.