Current Affairs 31 October 2019
आजपासून जम्मू काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश
यापुढे जम्मू काश्मीरचे स्वत:चे संविधान आणि कोणताही स्वतंत्र झेंडा नसेल.
– लोकसभेत मंजूर झालेल्या जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयकानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख मध्यरात्री १२ वाजल्यापासून केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी हा मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय घेतला होता.
– जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा समाप्त करून त्याऐवजी जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
– एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळण्याची किंवा एखाद्या राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन होण्याची अनेक उदाहरणे असली; तरी एखाद्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत रूपांतर होण्याचे उदाहरण पहिल्यांदाच घडत आहे. आता देशातील राज्यांची संख्या २८ होणार असून, केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ वर जाणार आहे.
– केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जी.सी.मुर्मू आणि लडाखमध्ये आर.के माथूर यांची उपराज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
काय होतील बदल…
– आजपासून प्रशासनिक आणि राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक मोठे बदल होणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये १११ विधानसभेच्या जागा होत्या. त्यापैकी ४ लडाखच्या होत्या. परंतु आता हे संपुष्टात येणार आहे. केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या १०७ जागा असतील. परंतु त्या ११४ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यापैकी ८३ जागांसाठी निवडणूक घेण्याचत येणार आहे. तर दोन जागा नामनिर्देशन पत्राद्वारे भरल्या जाणार आहेत. तर २४ जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
आता आलं १२५ रूपयांचं नाणं, अर्थमंत्र्यांनी केलं लोकार्पण
– प्रसिद्ध योगी आणि सेल्फ-रियलायजेशन फॅलोशिपचे संस्थापक परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून १२५ रूपये मुल्याचे विशेष नाणे जारी करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये १२५ रूपयांचे नाण्याचे लोकार्पण केलं. यावेळी अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.
– १२५ रूपयाच्या विशेष नाण्याच्या समोरील बाजूला अशोकचक्र हे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. हिंदीमध्ये भारत तर इंग्रजीमध्ये इंडिया सह १२५ रूपये छापलं आहे. या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला परमहंस योगानंद यांचे छायाचित्र छापले आहे. त्यासोबतच हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘परमहंस योगानंद यांची १२५ वी जयंती’ आणि त्यांच्या जन्म-मृत्यूचं वर्ष नमूद करण्यात आलं आहे. ३५ ग्रॅमचं हे विशेष नाणं तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, पाच टक्के निकल आणि पाच टक्के जस्तचा वापर केला आहे.