---Advertisement---

Current Affairs – 5 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

anjum-moudgil-apurvi-chandela
---Advertisement---

पुणे विमानतळाची मालवाहतुकीत भरारी

  • देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल 72 टक्‍क्‍यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.
  • देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरपाठोपाठ पुण्याने स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत तब्बल 72 टक्‍यांनी हवाई मालवाहतूक वाढली आहे. इतर विमानतळांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे.
  • देशातील 28 विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे.

अंजुम आणि अपूर्वीने ऑलिम्पिक पात्रता मिळवली

  • जपानमध्ये २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या नेमबाजीमध्ये सर्वप्रथम पात्रता पटकावण्याचा मान भारताच्या अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुदगिल यांनी पटकावला आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत अंजुमने द्वितीय स्थानासह रौप्यपदक, तर अपूर्वीने चौथे स्थान पटकावत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.
  • या दोघींनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) जागतिक चॅम्पियनशिपच्या १० मीटर रायफलच्या प्रकारात हे यश पटकावले आहे.
  • टोकियोतील स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठीची ही पहिलीच नेमबाजी स्पर्धा आयएसएसएफने भरवली होती. त्यात नेमबाजीच्या १५ प्रकारांमध्ये प्रत्येकी ४ याप्रमाणे ६० नेमबाज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणार आहेत. त्यामध्ये या दोघींनी जरी ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी या गटात अन्य जे नेमबाज पुढेदेखील पात्र होतील, त्यातील सर्वोत्तम गुण मिळवलेल्या नेमबाजांमधून भारताच्या राष्ट्रीय रायफल संघटना अंतिम स्पर्धकांची निवड करणार आहे.

भारत आणि अमेरिकेत या आठवडयात उच्चस्तरीय बैठक 

  • भारत आणि अमेरिकेत यांच्यात या आठवडयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत संभाव्य संरक्षण करारांना अंतिम स्वरुप देण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल. दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारांमागे उद्देश आहे. अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जीम मॅटिस, माईक पॉमपियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीत सहभागी होणार आहेत.
  • यापूर्वी दोनवेळा ही बैठक रद्द झाली आहे. मागच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये टू प्लस टू बैठकीचा निर्णय झाला होता. भारत आणि अमेरिकेमध्ये होणारी ही सर्वोच्च स्तरावरची चर्चा आहे. जगातील दोन मोठया लोकशाही देशांना मतभेद बाजूला ठेऊ परस्परसंबंध अधिक भक्कम करण्याची ही संधी आहे असे अधिकारी आणि तज्ञांनी सांगितले.
  • रशिया आणि इराण या देशांबरोबरच्या भारताच्या व्यापारिक संबंधांवर अमेरिकेला आक्षेप आहे. भारत रशियाकडून एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेणार आहे त्यावर अमेरिकेला आक्षेप आहे. टू प्लस टू बैठकीत हा कळीचा मुद्दा ठरु शकतो. अमेरिकेला त्यासाठी राजी करण्याचे भारतीय कुटनितीतज्ञांसमोर आव्हान आहे.
  • मागच्या दशकभरात भारत-अमेरिकेत अनेक संरक्षण करार झाले आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही देशांसमोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान आहे. उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचे आदान-प्रदान आणि ड्रोन विक्री संदर्भातील महत्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. अमेरिकेने त्यांचे ड्रोन तंत्रज्ञान आतापर्यंत निवडक देशांना दिले आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

---Advertisement---

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now