⁠  ⁠

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठात विविध पदांवर भरती, 8वी ते पदवीधरांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

DBSKKV Recruitment 2023 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ सिंधुदुर्ग येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा – 38

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – 04
शैक्षणिक पात्रता
: एम.एस्सी (Agri.)/ बी.एस्सी. (Ag.),एमबीए, आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

2) क्षेत्र सहाय्यक – 04
शैक्षणिक पात्रता :
बी.एस्सी. (Agri.) किंवा कृषी डिप्लोमा आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

3) कृषी चालक/मशीन ऑपरेटर – 02
शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 8 वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा 02) इयत्ता 4 थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 05 वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा 03) या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

4) चालक – 02
शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता ८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा 02) इयत्ता 4 थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 05 वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा 03) या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

5) लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर-02
शैक्षणिक पात्रता :
बी.कॉम / बी.एस्सी. / बी.ए., मराठी, इंग्रजी टायपिंग, MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

6) अन्न सुरक्षा दल सदस्य – 24
शैक्षणिक पात्रता
: इयत्ता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [आरक्षित प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – 44,000/-
क्षेत्र सहाय्यक – 29,000/-
कृषी चालक/मशीन ऑपरेटर – 22,000/-
चालक – 22,000/-
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर -22,000/-
अन्न सुरक्षा दल सदस्य – 300 रुपये प्रति दिन प्रमाणे

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article