दिल्ली हायकोर्टात १३२ पदांची होणार भरती
दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) पदांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मार्च आहे. ग्रुप सी मधील एकूण १३२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पदे – ज्युनिअर ज्युडिशिअर असिस्टंट / रिस्टोअरर
पात्रता – या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच टायपिंगचा स्पीड ३५ शब्द प्रति मिनिट असावा.
कुठे करावा अर्ज – http://delhihighcourt.nic.in/
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२०
अर्ज करण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२०
डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२०
शहर – नवी दिल्ली
वयोमर्यादा – किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे.
दिल्ली उच्च न्यायालयातील ही ग्रुप सी पदांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंग्रजी टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.