संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM-11) मध्ये विविध तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरु होईल. DRDO CEPTAM 11 Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 764
रिक्त पदाचे नाव :
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B)- 561
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) – 203
शैक्षणिक पात्रता :
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. इंजिनियरिंग, टेक्निकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा.
वयोमर्यादा : 18 ते 28 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
वेतनश्रेणी :
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी – 35,400/- ते 1,12,400/-
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) -19,900/- ते 63,200/-
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांतून केली जाईल, ज्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रता, तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यांची चाचणी समाविष्ट असेल.
टियर-१: संगणक-आधारित चाचणी (CBT): हा पहिला टप्पा संगणक-आधारित चाचणी (CBT) म्हणून घेतली जाणारी स्क्रीनिंग चाचणी असेल. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल.
टियर-२: कौशल्य/व्यापार चाचणी: टियर-१ उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना पदानुसार कौशल्य चाचणी किंवा व्यापार चाचणी द्यावी लागेल.







