⁠
Uncategorized

स्पर्धा परीक्षा पर्यावरण

पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या सभोताली असलेले वातावरण जे आपणास व इतर जीवास प्राभावित करते त्याला आपण पर्यावरण असे संबोधतो. पर्यावरणाचा अभ्यास हा सध्या खूप महत्वाचा मुद्दा बनलेला असून येणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचे असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. UPSC/MPSC परीक्षेत पर्यावरण या विषयावर विशेष भर दिलेला दिसतो.

MPSC पूर्व परीक्षेसाठी आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाबद्दल काही जास्त खोलवर माहिती दिलेली नाही.

“पर्यावरण विषयक सामान्य मुद्दे, जैवविविध्य आणि हवामान बदल (विषयाच्या विशेशिकृत अभ्यासाशिवाय)”

वरील अभ्यासक्रम पाहता असे लक्षात येते की, विचारलया जाणार्‍या प्रश्‍नांची काठीण्य पातळी ही इ.11 वी व इ.12 वी पर्यंतच असेल, परंतू जर मागील प्रश्‍नपत्रिका पाहिल्या असत्या आपल्याला असे लक्षात येईल की, आयोगाची प्रश्‍न विचारण्याची पद्धत व काठीण्य पातळी पर्यावरण या विषयाबद्दल असाधारण आहे. दरवर्षी जवळपास 5-7 प्रश्‍न हे पर्यावरण या विषयांवर असतात. परंतू या विषय किंवा संकल्पना ह्या बहुव्यापी आहेत. या विषयाचा अभ्यास करतांना आपल्याला भूगोल व व्रिज्ञान या विषयांचा देखील अभ्यास करावा लागतो. पर्यावरण या संकल्पनेत जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो.

पर्यावरण रक्षणासाठी काम करणार्‍या संघटना

1) संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम [United Nations Environment Programme (UNEP)]

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात 1972 मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत झाली. त्याचे प्रमुख कार्यालय केनियाची राजधानी नैरोबी येथे स्थित आहे. याचे प्रमुख कार्य म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत पर्यावरणात विविध परिषदांचे आयोजन करणे, त्यातून येणार्‍या शिफारशींना व्यावहारिक रुप देणे.

वातावरण बदलासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी Un Environment Official Website हे संकेतस्थळ पहावे.

2) युनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम (Man & Biosphere Programme)

मानव व जीवावरण (Man & Biosphere) यांच्यात जागतीक स्थरावर सुधारणा करण्यासाठी युनेस्कोद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात 1970 मध्ये करण्यात आली.

3) जागतिक वन्यजीव कोस (World Wildlife Fund)

वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी 1961 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड येथे आहे.

पर्यावरण रक्षणाचे कार्य करणार्‍या भारतातील महत्वपूर्ण संस्था

1) झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (Zoological Survey of India)

या संस्थेची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली. या संस्थेमार्फत प्राण्यांचे वर्गीकरण व मुलभूत संशोधन करण्यात येते.

2) बॉटेनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (Botanical Survey of India)

या संस्थेची स्थापना 1890 साली कलकत्ता येथे करण्यात आली. 1939 सालानंतर काही वर्षांसाठी ही संस्था बंद होती मात्र 1954 साली ही पुन्हा सुरु करण्यात आली.

3) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (Bombay History Natural Society)

ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्य व संशोधन करणारी सर्वात पुरातन बिगरशासकीय संस्था आहे. याची स्थापना 1883 मुंबई येथे झाली. या संस्थेमार्फत हॉर्नबिल हे लोकप्रिय मासीक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’ हे संशोधनपर मासीक प्रकाशीत होते.

जैवविविधता

Types-of-biodiversity

पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न आकाराचे आकारमानाचे संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसंत्रांचे कमी आधीक आयुष्यमानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात. त्यालाच जैवविविधता असे म्हणतात.

1992 मध्ये ब्राझीलच्या राजधानीत रिओ-दी-जिनेरियो येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत (Earth Summit) जैवविविधता हा शब्द प्रचलित झाला.

ecosystem mpsc study

परीक्षेत विचारलेले प्रश्‍न

1. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले.
A) 1958 B)1972 C)1985 D)1995

2. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे.
A) पश्‍चिम घाट B) पूर्व घाट C) हिमालय D) अरावली

3. ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
A) 2010 B) 2012 C) 2011 D) 2014

4. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे.
A) अरुणाचल प्रदेश B) छत्तीसगढ C) हिमाचल प्रदेश D) गुजरात

5) जोड्या लावा
mpsc-environment-question

mpsc-environment-answer

उत्तरे

  1. C
  2. A
  3. A
  4. C
  5. C

वरील पश्‍नांवरुन आपणास असे आकलन होते की, आयोगाचे पूर्व परिक्षेतील बहुतांश प्रश्‍न हे चालू घडामोडीला अनुसरुन विचारलेले असतात. मात्र त्यासाठी आपल्याला पर्यावरणीय संकल्पना या पूर्णपणे ज्ञात असणे आवश्यक आहे. आपल्याला चालू घडामोडी या संकल्पनेशी जोडता आल्या पाहिजे की, जेणेकरुन आपल्याला या विषयाशी व्यवस्थितपणे सांगड घालता येईल.

संदर्भ :-
1) इ.11 वी 12 वी चे बायोलॉजि विषयाचे
2) पर्यावरण परिस्थितिकी – तुषार घोरपडे, युनिक पब्लिकेशन
3) वृत्तपत्र
4) पर्यावरण मंत्रालय तसेच इतर वेबसाईट

लेखक – प्रा. दीपक चव्हाण, द युनिक अ‍ॅकॅडमी
मोबाईल नंबर – 7066703231
ई-मेल आयडी – deepakchavan003@gmail.com

स्पर्धा परीक्षांविषयी नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Related Articles

One Comment

Check Also
Close
Back to top button