⁠  ⁠

ESIC Recruitment : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 491 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये भरती निघाली आहे. एकूण 491 जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै आहे.

एकूण जागा : ४९१
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 197 पदे, एससी प्रवर्गासाठी 82 पदे, एसटी प्रवर्गासाठी 41 पदे, ओबीसी व आर्थिक दुर्बल वर्गासाठी 126 पदे व आर्थिक दुर्बल वर्गासाठी 45 पदे.

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणीक पात्रता : ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता तपासू शकतात.

वयोमर्यादा :
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फी : इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क ₹ 500/- आहे. SC/ST/PWD/विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे जी निवड मंडळाद्वारे घेतली जाईल.

पगार : या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर 11 अंतर्गत 67700 रुपये ते 208700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

इतर माहिती :

उमेदवारांनी भरलेला अर्ज प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद-121002, हरियाणा येथे शेवटच्या तारखेपूर्वी पाठवला पाहिजे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article