⁠  ⁠

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्याचा निकाल दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. युपीएच्या काळात हा कोळसा घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही आरोप झाले. मात्र, मधू कोडा यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यासह इतर चार जणांनाही दोषी ठरवण्यात आले. मधू कोडा हे २००६ मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते अपक्ष आमदार होते. कोडा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ‘ऑल झारखंड स्टुडंट युनियन’चे कार्यकर्ते म्हणून झाली होती. बाबूलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रिपद सांभाळले. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते. आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कोडा यांचे हात कोळसा घोटाळ्यात रंगले असल्याचे म्हणत त्यांना दोषी ठरवले आहे. झारखंडमधील कोळसा खाण वाटपात कोलकात्यातील ह्यविनी आयर्न आणि स्टील कंपनीला नियमबाह्य पद्धतीने खाण वाटप केल्याचे कोडा आणि इतर सनदी अधिका-यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कंपनीला झारखंडमधील राजहरा इथल्या कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या.

TAGGED:
Share This Article