---Advertisement---

हायर इंडिया इंडीस्ट्रीअल पार्क – देशातील पहिला औद्योगिक पार्क

By Saurabh Puranik

Published On:

Haier-Industrial-Park
---Advertisement---

रांजणगाव (पुणे) एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हायर इंडिया इंडीस्ट्रीअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क आहे. या पार्कमुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विविध करांच्या रुपाने महसूलातही मोठी वाढ होणार आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली  आहे. याला अनुकूल उद्योजक धोरण,कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड,जपान, अमेरीका, जर्मनी, नेदरलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणूक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणूकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंती आहे. पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याच बरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फूड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसीत होत आहे. भाजी पाला व फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या निमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या या परिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल.

  हायर इंडिया इंडस्ट्रीयल पार्कचे ठळक वैशिष्ट्ये:

१.      मेक इन इंडियाच्या धर्तीवरील मेक इन महाराष्ट्र अभियानातील गुंतवणूक.

२.      पार्कच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक.

३.      हायर इंडियाच्या माध्यामातून थेट २००० नवीन रोजगाराची निर्मिती तर अप्रत्यक्ष दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध.

४.      सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा हायर इंडिया कंपनीशी गुंतवणुकीचा करार.

५.       सन २०१६ साली प्रकल्पाचे भूमिपूजन.

६.      या प्रकल्पाच्या माध्यमातून हायर इंडिया कंपनीच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ होऊन रेफ्रिजरेटरचे उत्पादन १.८ मिलियन होणार.

७.      त्याचबरोबर या प्रकल्पात एलइडी टेलिव्हिजन, वाशिंग मशीन, वाटर हिटर आणि एअर कंडीशनरचे उत्पादनही होणार.

८.      सन २०१५ साली हायर इंडिया कंपनीने ‘मेक इन इंडिया अवार्ड फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळविला होता.

९.      रांजणगाव मधील हा प्रकल्प ४० एकर क्षेत्रावर.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now