मागच्या लेखात prelim च्या अभ्यासाचा overall आढावा घेऊन झाल्यावर आता CSAT च्या पेपर चे महत्व आणि त्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येतील, हे जसं मला समजलं तसं मांडायचा हा एक प्रयत्न.
CSAT पेपर चे महत्व:-
एप्रिल 2017 मध्ये झालेल्या राज्यसेवा prelim चा cutoff अनपेक्षित रित्या वाढून 189 वर गेला. पण यात खूप आश्चर्य चकित होऊन चालणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी CSAT ला 130-150 दरम्यान मार्क मिळवले. त्यामुळे एकूण 200 चा टप्पा पार करणे त्यांना अवघड गेले नाही.
Prelim हि 400 मार्कांची असते. त्यात GS आणि CSAT दोन्हींना प्रत्येकी 200 गुण असतात. परंतु आपल्यापैकी किती जण जेवढा वेळ GS च्या तयारीला देतात तेवढाच CSAT ला देतात?? कोणीही नाही.
पाच पाच महिने prelim च्या GS चा अभ्यास करणारे विद्यार्थी CSAT कसेबसे 2 महिने करतात आणि तेही रोज एखादा तास. परीक्षा जवळ आली कि करू म्हणून CSAT नेहमी मागे ठेवले जाते. आणि मग जशी परीक्षा जवळ येते तसं TENSION वाढत जातं आणि मग विद्यार्थी GS वरचाच FOCUS वाढवतात आणि CSAT पूर्णतः दुर्लक्षित होते. आणि एवढे करूनही CSAT मधेच GS पेक्षा जास्त मार्क पडतात. पण मग बेरीज मात्र CUTOFF च्या खालीच राहते.
राज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे
GS चा कितीही अभ्यास केला तरी अमुक एवढे मार्क पडतीलच असं कोणीही सांगू शकत नाही. प्रश्नांची पातळी पाहता 100 पैकी 30 प्रश्न माहिती असणे हि खूप झाले. त्यामुळे GS वर खूप मदार ठेवणे धोकादायक ठरू शकते.
याउलट CSAT हा असा विषय आहे ज्यात तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे तुमचे मार्क्स वाढत जाणार. जेवढं PRACTICE जास्त तेवढी प्रश्न सोडवण्याची गती वाढते. आज ज्या प्रश्नाला 2 मिनिटे लागतात तोच प्रश्न रोजच्या सरावाने 40 सेकंदात सुटतो. त्यामुळे csat ला 110 ते 150 मार्क्स पाडणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी योग्य प्रकारे तो विषय हाताळला पाहिजे.
म्हणून जर कमीत कमी ताण घेऊन PRELIM पास व्हायचं असेल तर CSAT शिवाय पर्याय नाही.
CSAT च्या अभ्यासाला किती वेळ द्यावा?
ज्या दिवशी तुम्ही PRELIM साठी GS चा अभ्यास सुरु करता त्याच दिवसापासून CSAT सुद्धा हाती घ्यावे. रोजच्या वेळेचा 30% वेळ हा न चुकता CSAT ला दिलाच गेला पाहिजे. PRELIM च्या GS चा बराच भाग MAINS ला असल्यामुळे त्याचा अभ्यास असतोच पण CSAT हा पुर्णतः नवीन विषय असल्यामुळे 30% वेळ द्यावाच. म्हणजे साधारणपणे रोज 3 तास.
CSAT चा अभ्यास कसा करावा?
CSAT ला कोणत्याही पुस्तकापेक्षा जुन्या प्रश्नपत्रिका जास्त महत्वाच्या. त्यातून कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांची काठिण्य पातळी किती असते ते कळून येतं. आणि मग कोणताही पुस्तक घेतलं तरी आपल्या कामाच्या गोष्टी त्यातून शिकून घेता येतात. अभ्यासाची सुरुवातच पेपर सोडवून करावी. त्याने तुम्हाला स्वतःचाच अंदाज येईल.
अभ्यास सुरु करताना मागील 2 वर्षाचे पेपर time लाऊन बसून सोडवा. त्यानंतर 2 तास त्या पेपर्स चा analysis करा. पहिल्या पेपर मध्ये आणि दुसऱ्या पेपर मध्ये किती प्रश्न सोडवून झाले, किती राहिले, का राहिले हे सगळं व्यवस्थित बघून घ्या. महत्त्वाचे प्रश्नाचे प्रकार note करा. तुम्हाला कोणते जमले, कोणते अर्धे जमले, कोणते आजिबात जमले नाहीत याची यादी बनवा.
काही लोकांना वाटेल हि असली वेळकाढू कामं करण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. पण यासाठी दिलेला 1 तास तुमचं एक वर्ष वाचवू शकतो. त्यामुळे planning आणि preparation याचं महत्व वेळीच जाना.
सुरुवातीला तुम्हाला जे प्रश्न जमले ते कोणत्याही एका पुस्तकातून लगेच पक्के करून घ्या. जेणेकरून त्यावरचा कोणताही प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. आणि ते प्रश्न तुम्हाला ऑलरेडी येत असल्यामुळे त्यातले बारकावे पटकन समजतात. उदाहरणार्थ समजा मला train चे प्रश्न सुटतात तर मी त्या प्रकारच्या प्रश्नातले सगळे बारकावे पाहून तो विषय पक्का करून घेईन. हे झाले कि मोर्चा अर्धवट येणाऱ्या प्रश्नाकडे वळवा. आणि सगळ्यात शेवटी जे अवघड वाटले त्यांच्याकडे. जेंव्हा तुम्ही अवघड प्रश्नांना हात घालाल तेंव्हा अगोदर सोप्पे प्रश्न सोडवल्याने तुम्हाला विषयात गती आलेली असेल आणि अगोदर अवघड वाटणारे प्रश्न आपोआप थोडे सोप्पे वाटू लागतील आणि अभ्यास करणं एकदम सोप्पं होऊन जाईल.
अपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – @MissionMPSC
एक पुस्तक घेऊन ते start to end वाचलंय असा csat चा अभ्यास कधीच करू नये. अभ्यासाचा कालावधी तुमच्या सोयी आणि गरजे नुसार 5-5 किंवा 6-6 किंवा 10-10 दिवसांच्या period मध्ये विभाग. पहिल्या दिवशी वेळ लाऊन पेपर सोडवायचा आणि 1 तास तो check करून analysis करायचे. पुढचे 5 किंवा 6 दिवस प्रश्नाचे type नुसार practice करावी. त्यात प्राधान्य क्रम सोडवलेल्या पेपर वरून ठरवावा. अवघड जाणाऱ्या घटकांवर जास्त वेळ खर्च करावा. उदा- मला घड्याळ, pipe, आणि पॅसेज अवघड गेले. मग मी 1 दिवस pipe, 1 दिवस घड्याळ आणि 1 दिवस पॅसेज करेन. आणि उरलेल्या 3 दिवसात बाकीचे type पाहून घेईन.
फक्त एक काळजी घ्यायची कि प्रश्न सोडवताना ते वेळ लावूनच सोडवायचे. अमर्यादित वेळ दिली तर सगळे प्रश्न सगळे जण सोडवतील. खरे skill आहे ते वेळेत सोडवण्यात.
हीच सायकल दर 6-7 दिवसानंतर रिपीट करायची. जशी परीक्षा जवळ येईल तसे पेपर सोडवण्याचे प्रमाण वाढवत जायचे.
Passages ला किती महत्व द्यायचे?
विद्यार्थ्यांची एक मोठी चूक होते ती हि कि, ते खूप वेळ quantitative aptitude चे प्रश्न सोडवण्यात घालवतात जे कि 80 पैकी 20 पेक्षा कमी असतात. आणि जवळपास 50 मार्क ना येणारे passages दुर्लक्षित होतात. त्यामुळे csat च्या वेळेपैकी 50% वेळ passage च्या अभ्यासातच घालवावा. त्याशिवाय csat ला स्कोर करणे शक्य नाही.
Passages चा अभ्यास कसा करावा?
सुरुवातीला मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतील आणि नंतर एखादे चांगले पुस्तक घेऊन त्यातले passages वेळ लाऊन सोडवावेत. नंतर लगेच ते चेक करून काय चुकले ते पहावे. बरोबर प्रश्न बरोबर का आले आणि चुकलेले प्रश्न का चुकले याचा चांगला अभ्यास करा. तुम्ही कोणत्या दृष्टीने उत्तर लिहिले आणि बरोबर उत्तरामागे काय लॉजिक आहे हे पहा. तुमचा विचार का चुकला याचा आढावा घ्या. विचार जेंव्हा बरोबर आला असेल तेंव्हा तो बरोबर का आला याचाही मागोवा घ्या. जेणेकरून असे केल्याने तुमच्या चूका कमी होऊन accuracy वाढत जाईल.
Passages सोडवताना फक्त passage मध्ये दिलेल्या गोष्टींचाच विचार करावा. आपल्याला माहिती असलेल्या इतर गोष्टी तिथे apply करू नये. एखादी माहिती जशी passage मध्ये दिलीय तशी गृहीत धरून उत्तर लिहावे. त्या बद्दल तुमचं मत किंवा तुम्हाला असलेली माहिती वेगळी असली तरी प्रश्न फक्त दिलेल्या passage वर अवलंबून असल्या कारणाने फक्त passage चाच विचार करून उत्तर लिहावे. Conclusion, नाव सुचवा सारखे प्रश्न practice ने हळू हळू जमू लागतात.
Passages चा पुरेसा अभ्यास न करताच मला ते जमत नाही असं बरेच लोक म्हणतात. पण तसं ना करता पुरेसा practice करा आणि मग बघा कि तुम्हाला ते जमणारच.
आर्टस् पदवी धारकांना csat अवघड जाते का?
ही सगळ्यात मोठी चुकीची धारणा मनात घेऊन बरेच non-engineering पदवीचे लोक CSAT कडे दुर्लक्ष करून GS वर FOCUS करू पाहतात. परंतु CSAT पेपर मध्ये 50 प्रश्न passages वर असतात 5 decision making, 10 puzzle type. या कोणत्याही प्रकारात आर्टस् आणि engineering पदवीधारक तेवढेच पारंगत असतात. राहता राहिला प्रश्न उरलेल्या 15 प्रश्नांचा, तर त्यातही नॉन इंजिनीरिंग विद्यार्थी सरावाने चांगले गुण मिळवू शकतात. त्यामुळे अभ्यास करण्याआधीच विषयाबद्दल मत बनवू नये.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC
मनात तशी भीती असेल तर आर्टस् पदवी धारकांनी वर दिलेल्या प्रमाणे csat ला पुरेसा वेळ द्यावा. Csat साठी दिलेला प्रत्येक तास तुमचे थोडे थोडे मार्क वाढवणारच. असे आपण GS च्या बाबतीत म्हणू शकत नाही.
सर्वसाधारण BOOKLIST:
1.R S Agrawal- quantitative and verbal non-verbal aptitude(selective reading- पूर्ण वाचायची गरज नाही)
2. जुन्या प्रश्नपत्रिका
3. Upsc prelim च्या csat च्या गेल्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका
4. Passages साठी arihant publication किंवा इतर कोणतेही पुस्तक
5. बाजारात उपलब्ध 3 वेगवेगळ्या class च्या प्रश्नपत्रिका
6. कोणतेही पुस्तक प्रश्नपत्रिकेचे गरजे नुसार वापरता आले पाहिजे.
परीक्षेचे 2 तास कसे प्लॅन करायचे यावर स्वतंत्र लेख लिहीन.
वरील गोष्टी सर्वच्या सर्व कोणाला लागू पडतील असे नाही. माझ्या अनुभवाचा तुम्हास फायदा व्हावा ही आशा करतो. अभ्यास आणि परीक्षेसाठी शुभेच्छा. – अमोल मांडवे (ACP/DYSP)
(अमोल मांडवे सरांच्या वाटाड्या या ब्लॉगवरून साभार.)