या लेखात बहुपर्यायी प्रश्न MCQs वेगवेगळ्या पद्धतींनी कसे सोडवावे आणि योग्य पर्याय कसा निवडावा याविषयी मुद्दे मांडले आहेत. याचा सराव केल्यास जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यास मदत होईल.
महत्वाची टीप – सर्व पद्धती या संभ्रमावस्थेत अथवा चुका टाळण्यासाठी म्हणून वापराव्या. योग्य उत्तर माहित असेल तर याचा वापर करु नका.
1) अतिशयोक्ती असलेले (Extreme) पर्याय
यात – “ फक्त, केवळ, च प्रत्यय ” यांचा समावेश होता. साधारण पणे असे पर्याय चूक असण्याची शक्यता जास्त असते.
उदा. खालील कुठले विधान / विधाने बरोबर आहेत? (राज्यसेवा पूर्व 2018)
अ) लोकसभा नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशीत सभासद असतात
ब) राज्यसभेवर अॅग्लो इंडियन दोन सभासद नेमण्याची तरतूद आहे
क) किमी नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत कोणतेही बंधन नाही
ड) नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन निवडणुकीत मतदान करु शकतात.
पर्याय : 1) अ आणि ब 2) क आणि ड 3) फक्त ब 4) फक्त क
2) तारतम्य नसणारे पर्याय
यात संबंधित पर्याय व प्रश्न यांचा ताळमेळ बसत नाही, असे पर्याय बाद करता येतात.
उदा. 2006 सालानंतर कोणत्या ग्रहाला ग्रह मानले जात नाही, मात्र बटू ग्रह संबोधले जाते? (राज्यसेवा पूर्व 2015)
1) बुध 2) युरेनस 3) नेपच्युन 4) प्लुटो
यात बुध, युरेनस, नेपचुन हे ग्रह सर्वसामान्यपणे माहित आहेत व म्हणून प्ल्युटी बाद करता येतो
3) शक्यतादर्शक पर्याय
हे असू शकते, शक्यता आहे, असे पर्याय साधारपणे बरोबर ग्राह्य धरावे (प्रश्न 24 राज्यसेवा पूर्व 2019)
4) ज्या प्रश्नांत दोन पर्याय निश्चित बाद होतात ते प्रश्न Attempt करावे
उदा. सुर्वणक्रांतीचा संबंध ……….आहे (राज्यसेवा पूर्व 2015)
1) अन्न उत्पादन 2) दुग्ध उत्पादन
3) मधुमाक्षिका पालन 4) फुलोत्पादन
यात अन्न उत्पादनासाठी हरीत क्रांती व दुग्ध उत्पादनासाठी श्वेत क्रांतीचा संदर्भ आपणास माहित नाही म्हणून हे दोन पर्याय बाद करता येतात.
त्यावेळी असे प्रश्न Attempt करणे जास्त फायद्याचे ठरते.
5) Logical Elimination
यात पूर्व माहिती किंवा चालू-घडामोडींचा संदर्भ लावून योग्य पर्याय निवडता येतो
उदा. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते? (राज्यसेवा पूर्व 2018)
1) आर्थिक सिद्धी व स्थिर विकास साधणे
2) जलद वृद्धी व विकास साधणे
3) जलद व अधिक सर्वसामावेशक वृद्धी
4) जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसामावेशक वृद्धी साधणे
2012 ते 2017 या काळात शाश्वत विकार ध्येय (SDG) चर्चेत होते त्या संदर्भाने हा पर्याय योग्य ठरतो.
6) दोन समान वाटणार्या पर्यायांत संभ्रम असल्यास जो पर्याय अंतिम निर्ष्कषा पर्यंतने तो पर्याय निवडावा
वरील सर्व पद्धती या संभ्रमावस्थेत अथवा चुका टाळण्यासाठी म्हणून वापराव्या. योग्य उत्तर माहित असेल तर याचा वापर करु नका. तसेच सराव केल्यावरच याचा योग्य उपयोग करुन घेता येईल म्हणून जास्तीत जास्त सराव करा.
Wishing You the Best!
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर फॉलो करायला विसरू नका.