IAS Success Story दरवर्षी बरेच जण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यात काही तीन-चार प्रयत्नानंतर युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी होतात. परंतू, काही उमेदवार असे आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात. अशाच, IAS अधिकारी अनन्या सिंग या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे.
IAS अनन्या सिंग युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तेव्हा ती फक्त बावीस वर्षांची होती. तेव्हा ती अधिकारी बनली. तिने युपीएससीच्या परीक्षेत ५१वा क्रमांक मिळवला.
आयएएस अधिकारी अनन्या सिंग ही मूळची प्रयागराज, उत्तर प्रदेशची असून तिने तिचे शालेय शिक्षण सेंट पीटर्सबर्गमधून पूर्ण केले आहे. लहानपणापासून अनन्या हुशार होती. इतकेच नाहीतर तिने दहावी व बारावीच्या परीक्षेत टॉप केले होते. ती या दोन्ही वर्गात CISCE बोर्डातून जिल्हातून टॉपर होती. अनन्याने दहावीत ९६ टक्के आणि बारावीत ९८.२५ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर अनन्याने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी पूर्ण केली आहे.
आयएएस अधिकारी अनन्या सिंगला सिंथेसायझर वाजवण्यात खूप हुशार आहे आणि तिला वाचनाची आवड आहे. जेव्हा तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सुरुवात केली तेव्हा तिने सर्वप्रथम अभ्यासक्रमाचा अभ्यास केला. स्वतःचे नोट्स स्वतः काढले. तिने मुख्य परीक्षा दिल्यानंतर पुन्हा उत्तर लिहिण्याचा सराव सुरू केला. तिला वेळेअभावी जास्त लेखनावर लक्ष केंद्रित करता आले नाही. मात्र, तिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.अनन्या सिंगला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी बनून देशसेवा करायची होती. पदवीच्या शेवटच्या वर्षात तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
अनन्या सिंग यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवातीला रोज ७-८ तास अभ्यास करायची. नंतर नंतर तिने अभ्यासाचा वेळ कमी केला आणि रोज ६ तास तो निश्चित केला. मात्र तिने एक काळजी घेतली कोणत्याही दिवशी ६ तासांपेक्षा कमी वेळ अभ्यास केला नाही.प्री अँड मेन्स परीक्षेच्या आधीचा काळ खूप कठीण आहे आणि या काळात कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे. अनन्याने केवळ एक वर्ष सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने २०१९ मध्ये नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतात ५१ वा क्रमांक मिळविला आणि आयएएस अधिकारी बनली.सध्या पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत.