---Advertisement---

चांगल्या पगाराची नोकरी सोडून धरली स्पर्धा परीक्षेची कास ; अंकिता झाली IAS अधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IAS Success Story खरंतर बरेच विद्यार्थी हे आयआयटीमध्ये जाण्याची आणि नंतर उच्च पगाराचे पॅकेज मिळवण्याची धडपडत असतात. तर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसून येतात. आय.आय.टी मधून शिक्षण होऊन देखील अंकिताने हा स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडला. त्यासाठी ती धडपड राहिली आणि तिला यात यश आले. वाचा आय.ए.एस अंकिता पनवारचा प्रेरणादायी प्रवास….

जींद जिल्ह्यातील गोसाई गावात राहणारी ही अंकिता पनवार. अंकिताने चंदीगडमध्ये बारावी उत्तीर्ण केल्यानंतर ९७.६ टक्के गुण मिळवून तिचा यूपीएससी प्रवास सुरू केला. इतकेच नाहीतर तिने जेईई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आय.आय.टी मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. तिला खाजगी कंपनीत नोकरी देखील मिळाली.२२ लाखांच्या पॅकेजसह कॅम्पस प्लेसमेंट मिळवले. दोन वर्षांची कॉर्पोरेट कारकीर्द यशस्वी असूनही, अंकिताने नागरी सेवांबद्दलची तिची आवड पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परंतू, ती पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली.

त्यानंतर तिने २०२० मध्ये तिने दुसऱ्यांदा युपीएससीची परीक्षा दिली आणि ३२१वा रँक मिळवला. आय.ए.एस होण्यासाठी तिची धडपड चालूच राहिली. तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला. २०२२ मधील तिच्या चौथ्या प्रयत्नात २८व्या रँकसह युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
मित्रांनो, आपल्याला एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनिषा बाळगली तर यशाची पायऱ्या सहज चढता येतात.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts