⁠
Inspirational

आयआयटी ते आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया यांची प्रेरणादायी यशोगाथा; नक्की वाचा..

IAS Success Story कोणत्याही पदासाठी उच्च शिक्षण हा महत्त्वाचा पाया आहे. आपले उच्च शिक्षण आणि अनुभव सोबत असेल तर आपण कोणतेही स्वप्न सहज पूर्ण करू शकतो.‌ अर्थात यात जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची तयारी ही हवीच.

आयआयटी-बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया यांचा प्रवास अनोखा आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी पर्यंत मजल मारली‌ आहे. आयएएस कनिष्क कटारिया यांनी फक्त युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यावर इतके लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी आपली गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि २०१९ मध्ये ऑल इंडिया रँकसह प्रथम क्रमांक मिळवण्यात यश मिळविले.

आयएएस कनिष्क कटारिया हे मूळचे राजस्थानमधील कोटा येथील आहेत. यांनी आपले शालेय शिक्षण कोटा येथील सेंट पॉल सीनियर शाळेत पूर्ण केले. कनिष्क कटारिया हा अभ्यासात नेहमीच चांगला होते. त्यामुळेच त्यांनी आयआयटी जेईई २०१० मध्ये ४४वा क्रमांक मिळवला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक्समध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे येथे शिक्षण घेतले.कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली.

काही वर्षांनी, ते भारतात परतले आणि बंगळुरूमध्ये एका अमेरिकन स्टार्टअप कंपनीत रुजू झाले. त्यांना या नोकरीतून खूप चांगला पगार मिळवत होते पण त्यांनी ही नोकरी सोडून युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. कनिष्क कटारिया यांनी दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये काही महिने विशेष शिक्षण घेतले आणि नंतर स्व-अभ्यासासाठी कोटा येथे तयारी केली. दिवसभर अभ्यास आणि त्या आधारित उपक्रम यामुळे त्यांना २०१९ मध्ये ऑल इंडिया पहिला रँक मिळवला. अखेर आयएएस अधिकारी बनण्यात यश आले.‌

Related Articles

Back to top button