⁠  ⁠

चांगल्या पगाराची नोकरी सोडून धरली स्पर्धा परीक्षेची वाट ; अन् पहिल्या प्रयत्नात बनली IAS

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IAS Success Story प्रत्येकाचा यशाचा एक अनोखा दृष्टीकोन असतो. प्रत्येक विद्यार्थी हे कठोर परिश्रम आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी धडपडत असतात. पण विशिष्ट टप्प्यावर आल्यावर चांगली नोकरी असावी, असे देखील प्रत्येकास वाटते. तसेच नेहा बॅनर्जी हिला चांगल्या पगाराची नोकरी लागली पण त्यात काही मन रमले‌ नाही. तिने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

कोलकाता येथे जन्मलेल्या नेहा बॅनर्जीचे साऊथ पॉइंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले. नंतर,ती आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. ज्यामुळे तिला आयआयटी खरगपूर येथे प्रवेश मिळाला. तिला बी.टेक २०१८ मध्ये तिची इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त झाली. त्यानंतर, नेहाने कॉर्पोरेट जगात प्रवेश केला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून उच्च पगाराची नोकरी मिळवली. पण तिला स्पर्धा परीक्षेचे स्वप्न खुणावत होते.

म्हणून तिने २०१९ मध्ये नोकरी सोडून एका नवीन प्रवासाला सुरुवात केली. तिने पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली‌ व विसावा रॅंक मिळवला. यासाठी तिने वेगवेगळ्या कोचिंग सुविधांमध्ये सराव मुलाखतींना उपस्थित राहून आणि ऑनलाइन लेक्चर्स, विशेषत: यूट्यूबचा वापर करून तिच्या परीक्षेची तयारी केली. नेहाने संपूर्ण प्रवासात कठोर परिश्रम आणि एका निष्ठेने यशाच्या सर्व अडथळ्यांवर मात करता येते हे तिने केवळ दाखवून दिले नाही तर तिची कहाणी देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Share This Article