---Advertisement---

वाचा बावीसाव्या वर्षी IAS झालेल्या स्वातीच्या यशाची कहाणी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IAS Success Story ती फक्त बावीस वर्षांची होती जेव्हा तिने भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.आज ती अधिकारी म्हणून साऱ्यांची आवडत्या अधिकाऱ्यांपैकी एक आयएएस अधिकारी आहे. तिचे नाव IAS स्वाती मीना नाईक.

२००७ च्या बॅचच्या सर्वात तरुण आयएएस अधिकारी होत्या. एका सामान्य विद्यार्थ्यापासून देशातील सर्वात प्रतिष्ठित अधिकारी हा त्यांना प्रेरणादायी प्रवास खरोखरच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे.

---Advertisement---

राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी असलेल्या स्वाती शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण अजमेरच्या सोफी गर्ल्स कॉलेजमधून झालेस्वातीच्या आईची नेहमीच इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे आणि औषधाचा अभ्यास करावा.

त्यांना मात्र आयएएस व्हायचे होते. त्यांच्या आसपास मधील एक काकू अधिकारी झाल्या तेव्हा त्या आठवीत होत्या. तेव्हापासूनच स्वाती यांनी यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता. ग्रॅज्युएशन झाल्यावर तयारी सुरू केली आणि काय अंदाज लावला….बहुगुणसंपन्न मुलीने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. ऑल इंडिया रँक (AIR)- २६० मिळवला. तसेच २००७च्या बॅचमधीव सर्वात तरुण अधिकारी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. स्वाती नेहमीच प्रवासात तिला मदत करण्याचे श्रेय तिच्या वडिलांना देते. ते स्वतः RAS (राजस्थान प्रशासकीय सेवा) अधिकारी आहेत. तिच्या व्यतिरिक्त, स्वातीची धाकटी बहीण २०११च्या बॅचची IFS (भारतीय विदेश सेवा) अधिकारी आहे. सध्या IAS स्वाती या मध्य प्रदेश केडरच्या अधिकारी आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts