⁠  ⁠

सायकल दुकान चालवणारा तरुण आयएएस अधिकारी होतो तेव्हा; वाचा वरुण बरनवालची यांची यशोगाथा…

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

आपली परिस्थिती बदलणे आणि त्या परिस्थितीला सामोरे जाणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते. यात कठोर परिश्रम आणि समर्पण द्यावेच लागते. वरुण बरनवालने आपल्या वडिलांच्या निधनामुळे लहान वयातच शाळा सोडण्याचा निर्णय घेतल्या होता. पण ते पुन्हा शिक्षणाकडे कसे वळले? स्पर्धा परीक्षा कसा अभ्यास केला? अधिकारी कसे झाले? वाचा त्याची यशोगाथा…

पालघरमधल्या भोईसर या भागातील वरुण बरनवाल हे रहिवासी. त्यांच्या वडिलांचे लवकर निधन झाल्याने त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. आता शिक्षण, कुटुंब समतोल कसा सांभाळायचा? घरच्या जबाबदारीमुळं त्याने वडिलांचं सायकल दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आणि सायकल पंक्चरचं दुकान चालवू लागले. त्यांनी काम करत असताना शालेय शिक्षण देखील पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत शहरात दुसरा क्रमांक पटकावला. मात्र त्यानंतरही त्याला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागले.पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

हे लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षणाचा पुन्हा ध्यास घेतला. बारावी केल्यानंतर वरुणने इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना फी भरण्यात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अभ्यास करत करत त्यानं सायकलचं दुकानही सुरुच ठेवले शिवाय ट्यूशन्सदेखील घ्यायचे. एका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इंजिनीअरिंग केल्यानंतर वरुणने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. एक दोन वर्षे नाहीतर त्यांनी तब्बल आठ वर्षे यावर मेहनत घेतली. एकमेव गोष्ट म्हणजे दिशा, परिश्रम आणि दृढनिश्चय यामुळे त्यांनी नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण देशात ३२ वा क्रमांक पटकावला आणि ते आयएएस अधिकारी झाले.

Share This Article