जर तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अर्ज करू शकता. आयडीबीआय बँकेने मुख्य डेटा अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासह अनेक पदांवर भरती काढलीय. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 पर्यंत आहे. IDBI बँकेनं निवडलेल्या उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या शाखांशिवाय इतर कोणत्याही शाखेत नेमणूक करू शकते. कृपया अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. बँक भरती अधिसूचनेची लिंक खाली दिली आहे.
एकूण जागा : ०६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मुख्य डेटा अधिकारी – 1 पद
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर
२) प्रमुख – प्रोग्रामर व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) – 1 पद
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर
३) उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) – 1 पद
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर
४) उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल)- 1 पद
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर
५) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 1 पद
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदव्युत्तर
६) प्रमुख – डिजिटल बँकिंग – 1 पद
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदव्युत्तर
वयोमर्यादा : हेड – डिजिटल बँकिंग आणि CISO पदासाठी किमान 45 वर्षे ते जास्तीत जास्त 55 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. तर अन्य पदांवर अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित केली गेलीय.
वार्षिक वेतन : Salary Annual CTC
मुख्य डेटा अधिकारी – ४० लाख ते ४५ लाख
प्रमुख – प्रोग्रामर व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) – ४० लाख ते ४५ लाख
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) – ४० लाख ते ४५ लाख
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल)- ४० लाख ते ४५ लाख
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – ५० लाख ते ६० लाख
प्रमुख – डिजिटल बँकिंग – ५० लाख ते ६० लाख
अर्ज कसा करावा हे जाणून घ्या?
पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा आणि भरावा. अर्ज भरल्यानंतर, ई-मेलच्या विषयावर पदाचे नाव लिहा आणि ईमेल आयडीवर ‘[email protected]’ पाठवा.
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ईमेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मे 2021 आहे.
निवड प्रक्रिया
अर्जासह निवड प्रक्रियेमध्ये पात्रता निकष, पात्रता आणि अनुभव इत्यादींवर आधारित प्राथमिक तपासणी आणि शॉर्टलिस्टिंग समाविष्ट असेल. केवळ अशा शॉर्टलिस्टेड उमेदवारांना संबंधित पदांतर्गत उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत पात्रता आणि पात्रतेच्या आधारे पुढील निवडीसाठी त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : idbibank.in
अर्ज (Application Form) : येथे पहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा