आयकर विभागात 100 पदांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 6, 2025
Follow Us

Income Tax Department Bharti 2025 : आयकर विभागात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड १ पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. केरळ येथे ही भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण १०० रिक्त पदे भरली जातील. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. याच वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

आयकर विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा.

या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल?
आयकर विभागाच्या अधिसूचनेत अर्ज कसा करायचा हे सांगितलं आहे. अर्जाची प्रत दिलेली आहे. हा अर्ज भरुन तुम्हाला आयकर आयुक्त, ७वा मजला, आयकर भवन, पुराना रेल्वे स्टेशन रोड, कोची ६८२०१८ येथे पाठवायचा आहे

निवड प्रक्रिया :
स्टेनोग्राफर ग्रेड-१ पदासाठी निवड प्रक्रिया खालील निकषांवर आधारित असेल:
प्रतिनियुक्तीचा आधार: उमेदवारांची निवड अधिसूचनेत नमूद केलेल्या निकषांनुसार त्यांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.
कागदपत्रांची पडताळणी: कॅडर कंट्रोलिंग अधिकारी अर्जांची पडताळणी करतील आणि उमेदवार आवश्यक पात्रता आणि अनुभव पूर्ण करतात याची खात्री करतील.
लेखी परीक्षा/मुलाखत नाही: ही प्रतिनियुक्तीवर आधारित भरती असल्याने, कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. निवड उमेदवाराच्या सेवा रेकॉर्ड आणि पात्रतेवर आधारित असेल.

अधिकृत संकेतस्थळ : incometaxindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now