---Advertisement---

खुशखबर ! रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Railway Recruitment 2020 For 1 lakh 40 thousand vacancies

भारतीय रेल्वे सुमारे 1 लाख 40 हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्या भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा 15 डिसेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. त्याविषयीची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी शनिवारी दिली.

संबंधित पदांसाठी सुमारे 2 कोटी 42 लाख अर्ज करण्यात आले आहेत. करोना संकटामुळे भरतीसाठीच्या परीक्षा आतापर्यंत होऊ शकल्या नाहीत. रेल्वेकडून परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

---Advertisement---

डिसेंबरमध्ये परीक्षा
रेल्वे डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून या परीक्षा 15 डिसेंबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत. रेल्वेच्या रिक्त जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. देशभरातील 1 लाख 40 हजार 640 जगांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणीकृत असणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी अर्ज प्राप्त
रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35208 जागा रिक्त आहेत. तर 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1 लाख 3 हजार 769 जागा ट्रॅकमन, सफाई, पॉईंटमन यासाठी आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

5 thoughts on “खुशखबर ! रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा”

Comments are closed.