IPS अधिकारी होण्यासाठी नासामधील नोकरी सोडली ; वाचा अनुकृती यांच्या यशाची कहाणी..
IPS Success Story : त्यांचे भारतीय पोलीस सेवेत (IPS) होणे हे स्वप्न होते. आयुष्यभर उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नासा मधील यशस्वी नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला. अनुकृती शर्माचा अतुलनीय प्रवास यात दिसून येतो.
अनुकृती शर्मा या राजस्थानमधील अजमेर शहरातील रहिवासी आहेत. त्यांची आई शिक्षिका होती, तर वडील २० पॉइंट विभागात काम करत होते. अनुकृतीने जयपूरच्या इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये जाऊन बीएसएमएसचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये प्रवेश घेतला.
अनुकृतीच्या आयुष्याला २०१२ मध्ये अनपेक्षित वळण मिळाले. जेव्हा त्यांना एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीच्या पीएच.डी.साठी प्रवेशाची ऑफर मिळाली. ह्यूस्टन, टेक्सास सारख्या विद्यापीठातून देखील ऑफर आली. अनुकृती यांनी पीएच.डी करत असताना, शिक्षणादरम्यान त्यांना अमेरिकेत नोकरीची ऑफर आली. नासाने ज्वालामुखींवर संशोधन करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती.देशासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने पीएचडीचे शिक्षण सोडले. त्यानंतर भारतात परतल्या आणि २०१४ मध्ये नेट जीआरएफ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना स्पर्धा परीक्षा आणि समाजकार्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी अभ्यासला सुरुवात केली. यात त्यांनी पतीची आणि कुटुंबाची बरीच साथ लाभली.
अनुकृती शर्मा यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नात IRS झाल्या. पुन्हा तिसरा प्रयत्न केला आणि २०२० मध्ये आयपीएस झाल्या.अनुकृती शर्मा सध्या उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे आयपीएस आहेत. यानंतर त्यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच बालविवाहाची माहिती मिळवण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे.गावातील महिला व मुलींवरील गुन्ह्यांव्यतिरिक्त जुगार, सट्टा, दारू, गांजा यासह इतर गुन्हे बंद करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या नोकरीतील कर्तव्य पार पाडण्याबरोबरच त्या गावागावात जाऊन जनजागृती करतात. असे बहुमोलाचे काम आहे.