उंटगाडी चालविणाऱ्याचा मुलगा बनला IPS !
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजस्थानच्या बिकानेर येथील प्रेमसुख देलू यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा केली. तो आयपीएस अधिकारी झाला.
राजस्थानमधील बिकानेर येथील रहिवासी असलेले प्रेम सुख देलू. हे एका शेतकरी कुटुंबात वाढले. आपल्या अंगावरील खर्च भागवण्यासाठी त्याचे वडील उंटगाडी चालवायचे. प्रेम सुख देलू यांचा मोठा भाऊ राजस्थान पोलिसात हवालदार आहे आणि त्यांनीच प्रेमला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले. प्रेमने नेहमीच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे .कारण त्याला आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे आहे.
त्यांचे दहावीचे शिक्षण त्यांच्या गावी असलेल्या सरकारी शाळेत पूर्ण केले. बिकानेर येथील शासकीय डुंगर महाविद्यालयातून त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी सुवर्णपदक मिळवून इतिहासात एम.ए पूर्ण केले. शिवाय, तो नेट – इतिहास परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.२०१० मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पटवारी भरतीसाठी अर्ज केला आणि त्यात ते यशस्वी झाले. आपल्यात यामध्ये अधिक क्षमता आहे असे त्यांना सतत वाटायचे. दरम्यान आयपीएस बनण्याची इच्छा मनात बाळगून असलेल्या या तरुणाने एक-दोन नव्हे तर तब्बल १२ सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेतली.अखेर आयपीएस बनून त्याने आपले स्वप्न सत्यात उतरविले.