⁠  ⁠

महाराष्ट्र कृषि विभागात 112 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Krushi Vibhag Bharti 2023 : कृषि विभाग पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : ११२

रिक्त पदाचे नाव : कृषी पर्यवेक्षक / Agricultural Supervisor
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती
02) स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील : i) नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून, ii) पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.
03). कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती.

परीक्षा फी : 650/- रुपये.
पगार : 35,400/- रुपये ते 1,124,00/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

परीक्षेचा अभ्यासक्रम व योजना :-
सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर-1) व कृषि विभागाचे विषय (पेपर-2).
प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 100 प्रश्न आणि तितकेच गुण आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल.

निवडीचे निकष :
कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.१३-अ, दि. 4 मे, 2022 मधील तरतुदीनुसार राहील.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article