⁠  ⁠

महाराष्ट्र वनविभाग भरतीच्या रिक्त पदांचा तपशील जाहीर!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MahaForest Bharti 2022 : महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. दरम्यान, वन विभागाची भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. दरम्यान, वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. 

प्रस्तुत प्रकरणी वनविभागातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांबाबत संवर्गनिहाय व वनवृत्तनिहाय माहिती या कार्यालयाचे पत्र संदर्भ १ अन्वये शासनास सादर केली आहे. आता शासनाने संदर्भ २ अन्वये विवरणपत्र-अ व ब मध्ये माहिती मागविली आहे. संदर्भ १ अन्वये शासनास सादर केलेल्या माहितीमध्ये क्षेत्रीय स्तरावरुन प्राप्त माहितीच्या आधारे सुधारणा करुन अद्यावत स्थिती विवरणपत्र-अ व ब मध्ये यासोबत सादर करण्यात येत आहे.

प्रतिलिपी(ई-मेलद्वारे):- मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव अग्रेषित. त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ व ब मधील माहिती अद्यावत करुन दिनांक २९/१२/२०२२ रोजी या कार्यासनास सादर करावी.

प्रतिलिपी (ई-मेलद्वारे):- प्रशासकीय अधिकारी, कक्ष-९/ कक्ष-१३ यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव अग्रेषित. त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ व ब मधील माहिती अद्यावत करुन दिनांक २९/१२/२०२२ रोजी या कार्यासनास सादर करावी.

प्रतिलिपी (ई-मेलद्वारे):- कक्ष अधिकारी, कक्ष-७ यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव अग्रेषित. यासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ व ब मधील माहिती अद्यावत करुन दिनांक २९/१२/२०२२ रोजी या कार्यासनास सादर करावी.

रिक्त पदांचा तपशील येथे पहा

image 9
Share This Article