⁠
Jobs

Mahaforest : महाराष्ट्र वन विभागात 127 जागांसाठी भरती ; पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

Mahaforest Recruitment 2023 वन विभाग नागपूर येथे भरती निघाली आहे. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 127 पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण रिक्त पदे : 127

रिक्त पदाचे नाव : लेखापाल (गट क) / Accountant (Group C)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 29,000/- रुपये ते 92,300/- रुपये. (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)

निवडीची पध्दत :-
ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.
लेखी परीक्षा :-
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

विषय- गुण
मराठी- ५०
इंग्रजी -५०
सामान्य ज्ञान – ५०
बौधिक चाचणी – ५०

परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
परीक्षा ही २ तासाची राहील.
उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

लेखी परीक्षेचा निकाल :– वनवृत्तनिहाय लेखी परीक्षेचा निकाल चे वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.

कागदपत्र तपासणी :- लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे :- लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती www. ———–या वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करताना सामान्य प्रशासनविभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील दरबनीनुसार करण्यात येईल

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button