एमपीएससी आयोगाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला होता. ()
त्याचबरोबर एमपीएससी भरतीसंदर्भात 30 तारखेच्या आत मंजूर पदांचा आढावा घेऊन एमपीएससीला मागणीपत्र पाठवा असा निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना दिले आहेत. राज्य सरकार एमपीएससी आयोगाला जागेसंदर्भात मागणीपत्र देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात होता. विद्यार्थ्यांची मागणी पाहता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत मागणीपत्र सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता 30 तारखेच्या आत मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.