Maharashtra Group-C Services Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025 (रात्री 23:59) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 938
रिक्त पदाचे नाव :
1) उद्योग निरीक्षक – 9 जागा
2) तांत्रिक सहायक – 4 जागा
3) कर सहायक – 73 जागा
4) लिपिक टंकलेखक – 852 जागा
शैक्षणिक पात्रता :
(एक) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
(दोन) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-
(अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
(तीन) पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
(चार) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.
(पाच) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
टंकलेखन अर्हता :-
कर सहायक : मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
लिपिक-टंकलेखक : मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ०१ फेब्रुवारी, २०२६ रोजी १८ ते ४३ (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु.294/-
किती पगार मिळेल :
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
तांत्रिक सहायक, विमा संचालनालय : २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
कर सहायक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
लिपिक-टंकलेखक : १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
| अधिकृत संकेतस्थळ : | mpsc.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







