⁠  ⁠

खुशखबर ! आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांसाठी मेगा भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता कोरोना काळात समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता आरोग्य विभागात सुमारे सतरा हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

या भरतीबाबत दि. 18 जानेवारी नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून आतापासून तयारीला लागल्यास नोकरी मिळवणे शक्य होणार आहे.

कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकारीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळला आहे.

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

Share This Article